पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
शहरी वायू वितरण (सी जी डी) क्षेत्रातील सी एन जी (परिवहन) व पी एन जी (देशांतर्गत) प्रभागांना किफायतशीर दराने स्वदेशी नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना
Posted On:
18 APR 2025 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2025
स्वदेशी नैसर्गिक वायूच्या वाटपाकरता बळकट यंत्रणा उभी करण्यासाठी सरकारने काही महत्वाची धोरणात्मक पावले उचलली आहेत. स्वच्छ ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन, शहरी हवेची गुणवत्ता सुधारणे तसेच देशांतर्गत ऊर्जा सुरक्षेच्या उद्दिष्टांशी ती अनुरूप आहेत. परिवहन उद्योगात वापरला जाणारा कॉम्प्रेसड नैसर्गिक वायू ( CNG) (T ) व घरगुती स्वयंपाकाच्या वापरासाठी पाईप द्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू (PNG) (D) या दोन्ही ग्राहकाभिमुख क्षेत्रांत किफायतशीर दराने व सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशांतर्गत वायू वाटप धोरणात खालीलप्रमाणे सुधारणा सुचवल्या आहेत.
1. आगाऊ तिमाही वाटप:
- आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाही पासून CNG (T) व PNG (D) क्षेत्राला आगाऊ सहामाही वायू वाटप करण्यात येईल.
- वाटपात आता ओएनजीसी आणि ऑइल या नामांकित क्षेत्रांमधून नवीन विहिरींमधून वायू काढणे (NAB) देखील समाविष्ट असेल.
- शहरी वायू वितरण कंपन्या अर्थात सीजीडी कंपन्यांच्या वायूसाठीच्या अंदाजित मागण्या आगाऊ मिळवून योजनाबद्ध रीतीने वायूचा पुरवठा व्हावा यासाठी तेल व नैसर्गिक वायू महामंडळ ओएनजीसी व भारतीय वायू प्राधिकरण (गेल) कार्यरत असतील.
2. प्रो-रेटा तत्वावर एनडब्ल्यूजी वाटप:
- वेळेवर आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एनडब्ल्यूजीसाठी लिलाव-आधारित वाटपाऐवजी त्रैमासिक प्रो-रेटा वाटप करण्यात येणार आहे.
- प्रचलित एमओपीएनजी मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीजीडी आस्थापनांना गेल त्यांच्या गरजांनुसार एनडब्ल्यूजी वाटप करेल.
3. वाटपाचे गुणोत्तर कायम ठेवण्यात आलेAllocation Ratios maintained:
- सीजीडी क्षेत्रातील मागणी वाढत असूनही घरगुती वापराच्या गॅसचे वाटपाचे गुणोत्तर व्यापक प्रमाणात कायम ठेवले आहे:
- 2024–25 ची तिसरी तिमाही: अंदाजित मागणीच्या 54.68% वाटप करण्यात आले
- 2025–26 ची पहिली तिमाही: 55.68% वाटप
- 2025–26 ची दुसरी तिमाही (अंदाजित): 54.74% वाटप
- परिवहन आणि घरगुती स्वयंपाक यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याची सरकारची बांधिलकी घरगुती गॅसच्या वाटपातील विस्तृत कक्षेतून प्रतिबिंबित होते.
4. भारतीय कच्च्या खनिज तेलाच्या साठ्यासोबत जोडलेले दर निर्धारण:
- एपीएम गॅस आणि न्यू वेल गॅस दोन्हीच्या किमती भारतीय कच्च्या खनिज तेलाच्या साठ्यासोबत जोडलेल्या असून, त्यांची दरनिश्चिती दरमहा होत असल्याने कच्च्या खनिज तेलाच्या दरात अलीकडेच झालेल्या घसरणीमुळे घरगुती गॅसचे हे वाटप सीएनजी (टी) आणि पीएनजी (डी) ग्राहकांसाठी नैसर्गिक गॅस अधिक किफायतशीर बनवेल.
सरकारच्या या धोरणात्मक उपाययोजनांमुळे सीजीडी संस्थांच्या मागणीचा अंदाज घेण्याच्या आणि कार्यक्षम पद्धतीने पुरवठा करण्याच्या क्षमतेत वाढ होईल, पुरवठ्याचे भाकित सुधारेल आणि कच्च्या तेलाशी संबंधित दरनिश्चितीमुळे सीजीडी कंपन्यांच्या किफायतशीरपणात वाढ होईल. या उपाययोजनांमुळे सीजीडी नेटवर्क अंतर्गत महत्त्वाच्या परिवहन आणि घरगुती गॅस पुरवठा क्षेत्रांसाठी एक स्थिर, परवडणारी आणि पारदर्शक घरगुती गॅस पुरवठा प्रणाली सुनिश्चित होईल, ज्यामुळे भारतातील लाखो शहरी आणि निम -शहरी ग्राहकांना फायदा होईल.
* * *
S.Kane/Uma/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122737)