सांस्कृतिक मंत्रालय
साहित्य अकादमीतर्फे 'दलित चेतना' कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
16 APR 2025 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2025
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या दलित चेतना कार्यक्रमात सहा प्रख्यात साहित्यिकांनी आपल्या साहित्याचे वाचन केले. महेंद्रसिंग बेनिवाल, ममता जयंत, नामदेव आणि नीलम यांनी कवितांचे वाचन केले आणि पूरण सिंग आणि टेकचंद यांनी लघुकथा वाचल्या. या सर्वानी आपल्या सादरीकरणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूलभूत शिकवण आणि त्यांच्या विचारसरणीतून कशा प्रकारे भेदभावरहित समाजाची निर्मिती करता येईल यावर भर दिला. सर्व प्रथम ममता जयंत यांनी “सभी ने छुआ था”, “जीवित इमरतें”, “ईश्वर”, “नही चाहिये” आणि “बहेलियों के नाम” या पाच कविता सादर केल्या. नामदेव यांनी त्यांच्या "बाबा भीम", "गाडीवान", "कुआन" आणि "पेहचान" या कविता वाचून दाखवल्या, त्यात डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी पाहिलेल्या स्वप्नांची सद्यस्थिती प्रतिबिंबित होते. “सबसे बुरी लडकी”, “नई दुनिया के रचयिता”, “तुम्हारी उम्मीदों पे खरे उतरेंगे हम” आणि “उठो संघर्ष करो” या कविता नीलम यांनी सादर केल्या. "सबसे बुरी लडकी" या कवितेने महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेच्या संघर्षाला प्रेरणा दिली. महेंद्रसिंग बेनिवाल यांनी “तसवीर”, “और कब तक मारे जाओगे”, “भेडिया” आणि “आग” या कवितांचे वाचन केले, ज्यांनी आधुनिक समाजाची दुहेरी मानसिकता अगदी अचूकपणे समोर आणली.
टेकचंद यांनी सादर केलेल्या कथेचे शीर्षक "गुबार" असे होते. यामध्ये काही दलित समुदायांमध्ये खोलवर रुजलेली अज्ञानाची मुळे अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. विविध दबावांमुळे लेखकाला तडजोड करावी लागत असलेले विडंबन दाखवणारी त्यांची "हवा का रुख" ही कथा पुरण सिंग यांनी वाचून दाखवली. (हिंदी) संपादक अनुपम तिवारी, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन केले. कार्यक्रमाला लेखक, पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* * *
G.Chippalkatti/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122078)