संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाविका सागर परिक्रमा 2 मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय नौदलाच्या आयएनएसव्ही तारिणीने केप टाऊनहून प्रयाण केले

Posted On: 15 APR 2025 5:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 15 एप्रिल 2025

भारतीय नौदलाच्या आयएनएसव्ही तारिणी या नौकानयन जहाजाने प्रवासाच्या अंतिम टप्प्यासाठी आज, 15 एप्रिल 2025 रोजी रॉयल केप यॉट क्लब (आरसीवायसी) येथून सकाळी साडेदहा वाजता (स्थानिक वेळ) म्हणजेच भारतीय प्रमाणित वेळेनुसार दुपारी दोन वाजता गोव्याच्या दिशेने समारंभपूर्वक प्रयाण केले. केप टाऊन मधील भारताच्या कौन्सिल जनरल, भारताचे दक्षिण आफ्रिकेसाठी नेमलेले संरक्षण संलग्नक, आरसीवायसी प्रशासक मंडळाचे सदस्य आणि केप टाऊन येथील भारतीय समुदायाचे प्रतिनिधी देखील या निरोप समारंभाला उपस्थित होते.

सदर सागर परिक्रमा हा संरक्षण दलांमध्ये कार्यरत भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे आणि लवचिकतेचे दशन घडवणाऱ्या तसेच भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेला अधोरेखित करणाऱ्या सागरी नौकानयनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे.

सध्या सुरु असलेल्या नाविका सागर परिक्रमा 2 चा भाग म्हणून आयएनएसव्ही तारिणी या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांच्या अभिमानास्पद नेतृत्वाखाली संचालित जहाजाने केप टाऊन येथे नियोजित थांबा घेतला.

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2117120

केप टाउनच्या बंदरावरील मुक्कामादरम्यान आयएनएसव्ही तारिणी या जहाजाने अनेक संपर्क कार्यक्रम तसेच राजनैतिक कार्यक्रमांसाठीचे केंद्र म्हणून भूमिका निभावली. तसेच खालील सन्माननीय पाहुण्यांचीही भेट घेतली : 

भारताचे दक्षिण आफ्रिकेतील उच्चायुक्त प्रभात कुमार.

वेस्टर्न केपचे उपसभापती रेगन अॅलेन.

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारताचे मित्र जोनाथन ऱ्होड्स.

प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब शर्यत 2022-23 ची विजेती आणि सुप्रसिध्द एकल परिक्रमक किर्स्तेन नॉशफर.

रुबी जसप्रीत, केपटाऊन येथील भारताच्या कौन्सिल जनरल.

भारतीय समुदायाचे सदस्य आणि स्थानिक मान्यवर.

या भेटीमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीची संधी मिळाली तसेच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वाढते सागरी सहकार्य अधोरेखित झाले.

मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्याव्यतिरिक्त आयएनएसव्ही तारिणीच्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक  समानता, महिला सक्षमीकरण आणि स्वदेशी बोट बांधणीमध्ये भारताची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने संवादात्मक कार्यक्रमांच्या मालिकेत सहभाग नोंदवला. यामध्ये हे अंतर्भूत होते:

भारतीय समुदायाच्या विद्यार्थ्यांशी एक विशेष संवाद.

केपटाऊनमधील आरसीवायसी येथे प्रमुख नागरिक आणि राजनैतिक समुदायाच्या सदस्यांसोबत अनुभव सामायिक करणे, जिथे अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल, समुद्रातील नौकानयनाच्या आव्हानांबद्दल तसेच नाविका सागर परिक्रमेमागील दृष्टिकोन सामायिक केला.

वेस्टर्न केप विद्यापीठातील प्राध्यापक आणि निवडक विद्यार्थ्यांसोबत एक औपचारिक सत्र.

नौदल कॉलेजमध्ये नौदल छात्रांशी, नौदल अधिकाऱ्यांच्या पुढील पिढीला प्रेरणा देणारा, संवाद

रॉयल केप यॉट क्लब (आर सी वाय सी) सेलिंग अकादमीच्या तरुण इच्छुक खलाशांशी  सागरी भावना आणि सौहार्द वाढवणारा संवाद

आयएनएसव्ही तारिणीची नियमित आणि आवश्यक देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी या थांब्याचा वापर केला, जेणेकरून प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यासाठी जहाज सर्वोत्तम स्थितीत राहील याची खात्री होईल.

आयएनएसव्ही तारिणी मे 2025 च्या अखेरीस गोव्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी इतिहासातील आणखी एक अभिमानास्पद अध्याय यशस्वीरित्या पूर्ण होईल. नाविका सागर परिक्रमा II ही महिला सक्षमीकरण, सागरी उत्कृष्टता आणि राष्ट्रीय अभिमानाचा दीपस्तंभ आहे.

***

S.Kane/S.Chitnis/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121927) Visitor Counter : 19