पंतप्रधान कार्यालय
हरिशभाई नायक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
12 APR 2025 2:29PM by PIB Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक हरिशभाई नायक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. सेवाभावी कार्य आणि संघटनात्मक कामांमध्ये त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक हरिशभाई नायक यांच्या निधनाने दुःख झाले. सेवाभावी कार्य आणि संघटनात्मक कामांमधील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.
त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आणि मृत्यूनंतर, त्यांच्या इच्छेनुसार भावी पिढ्यांच्या शिक्षणासाठी देहदान केले गेले, हे उल्लेखनीय आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती प्रदान करो, हीच प्रार्थना…
ॐ शांती...!!
***
M.Pange/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2121204)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam