पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान राबविल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्ली सरकारचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
11 APR 2025 8:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (पीएम-अभिम) राबविल्याबद्दल आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) अंतर्गत आयुष्मान भारत कार्डचे वितरण सुरू केल्याबद्दल दिल्ली सरकारचे कौतुक केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक्स/X या समाजमाध्यमावरील वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले की:
“दिल्लीच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक क्रांतिकारी पाऊल! डबल इंजिन सरकारचे हे अभियान माझ्या लाखो बंधू आणि भगिनींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आता दिल्लीतील रहिवासी देखील आयुष्मान योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतील याचा मला खूप आनंद आहे.”
***
SonalT/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2120826)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam