राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 09 APR 2025 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 एप्रिल 2025

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की: -

“महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासीयांना, विशेषतः जैन बंधू आणि भगिनींना माझ्या शुभेच्छा देत आहे.

अहिंसा आणि करुणेचे मूर्त स्वरूप असलेल्या भगवान महावीर यांनी 'अहिंसा परमो धर्म: ‘ म्हणजेच अहिंसा हाच सर्वोच्च धर्म आहे, या संदेशाद्वारे मानवतेला एक नवीन मार्ग दाखवला. महावीर जयंती आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा तसेच साधेपणा, दया आणि भौतिक संपत्ती व इच्छांपासून अलिप्तता या मूल्यांचा अवलंब करण्याचा संदेश देते.

आपण भगवान महावीरांची शिकवण आपल्या जीवनात आत्मसात करूया आणि समाजात शांती, अहिंसा आणि सौहार्द वाढवूया”.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120584)