पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचे केले स्वागत
पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये सन्माननीय अतिथी म्हणून घेतलेल्या सहभागाची केली आठवण
पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाला हार्दिक शुभेच्छा दिल्या
भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेल्या दृढ आणि ऐतिहासिक संबंधांचे महत्त्व दर्शवणारी ही भारत भेट असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा आणि लोकांचे लोकांशी संबंध यामधील भारत-संयुक्त अरब अमिराती सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या 4.3 दशलक्ष भारतीयांच्या कल्याणाची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले यूएईच्या नेतृत्वाचे आभार
Posted On:
08 APR 2025 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री महामहीम शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल् मकतूम यांचे भारतात स्वागत केले.
यावेळी पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये सन्माननीय अतिथी म्हणून घेतलेल्या सहभागाची आठवण केली. पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहीम मोहम्मद बिन झायेद अल् नाह्यान आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईचे शासक मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याविषयी जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान पिढ्यानपिढ्यांपासून सुरू असलेल्या दृढ आणि ऐतिहासिक संबंधांचे महत्त्व दर्शवणारी त्यांची ही भारत भेट असल्याचे सांगत परस्पर विश्वास आणि भविष्यासाठी सामाईक दृष्टीकोन यावर आधारित प्रदीर्घ काळ टिकणारी ही भागीदारी असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
या नेत्यांनी भारत-संयुक्त अरब अमिराती सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी, विशेषतः व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा आणि लोकांचे लोकांशी संबंध या क्षेत्रांमधील भागीदारी आणखी बळकट करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
दोन्ही देशांमधील प्रगतीशील संबंधांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या 4.3 दशलक्ष भारतीयांच्या कल्याणाची काळजी घेत असल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाकडे आभार भावना व्यक्त केली.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120196)
Visitor Counter : 28
Read this release in:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam