इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील सायबर सुरक्षा बळकट करण्यासाठी भारताने डिजिटल धोक्याची सूचना देणारा अहवाल 2024 हा पहिला अहवाल केला जारी

Posted On: 07 APR 2025 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 एप्रिल 2025

 

बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील सायबर सुरक्षेमध्‍ये लवचिकता असावी आणि त्‍यामध्‍ये बळकटी आणली जावी, यासाठी  एक ऐतिहासिक उपक्रम घेण्यात आला.  यामध्‍ये  सीईआरटी-इन  (एमईआयटीवाय), सीएसआयआरटी-फिन आणि जागतिक सायबर सुरक्षा कंपनी एसआयएसए, यांच्या सहकार्याने  बीएफएसआय  क्षेत्रासाठी डिजिटल थ्रेट रिपोर्ट म्हणजेच डिजिटल  धोक्याची सूचना अहवाल 2024 जाहीर करण्‍यात आला.  या अहवालामध्ये सध्याच्या आणि उदयोन्मुख सायबर धोक्यांचे आणि संरक्षण धोरणांचे व्यापक विश्लेषण करण्‍यात आले आहे.

हा अहवाल अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव  एस कृष्णन यांच्यासह संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे महासंचालक डॉ. संजय बहल आणि एसआयएयए चे संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी  दर्शन शांतमूर्ती यांच्या हस्ते जारी  करण्यात आला. 

A group of men holding awardsAI-generated content may be incorrect.

सहयोगी सायबर संरक्षण धोरण

याप्रसंगी बोलताना, एस. कृष्णन यांनी वित्तीय क्षेत्राच्या जलद डिजिटल परिवर्तनाशी संबंधित वाढती सायबर जोखीम यावर प्रकाश टाकला, ते म्हणाले: "बीएफएसआय परिसंस्थेच्या परस्परसंबंधित स्वरूपाचा अर्थ असा आहे की,  एकाच सायबर हल्ल्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात. अर्थात यामुळे प्रारंभी जे  लक्ष्य निश्चित केले जाते, त्‍याचा  अनेक घटकांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे  राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर समन्वय साधून  सायबर सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्‍याची  गरज अधोरेखित  होते. सायबर फसवणुकीमध्‍ये त्या प्रकरणाचा  वेळेवर शोध, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी सीईआरटी-इन  आणि सीएसआसआरटी -फिन  हे धोके कमी करण्यामध्‍ये  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ‘एसआसएसए’ च्या सहकार्याने विकसित केलेला हा अहवाल, बीएफएसआय संस्थांची  संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी आर्थिक धोके कमी करण्यासाठी त्‍याचबरोबर अत्याधुनिक सायबर हल्ल्यांचा प्रभावीपणे सामना करण्याकरिता   सामूहिक सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी हा अहवाल सक्षमकरेल.

सायबर सुरक्षा आर्थिक स्थिरतेचा पाया

यावेळी एम. नागराजू यांनी वित्तीय सेवांमध्ये मजबूत सायबर संरक्षणाची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली.  आर्थिक स्थिरता आणि विश्वासावर सायबर सुरक्षेच्या दूरगामी परिणामांवर त्यांनी  भर दिला - "सायबर सुरक्षा आता एक पर्यायी सुरक्षा  नव्हे तर  डिजिटल युगात आर्थिक स्थिरतेचा पाया आहे, असे ते म्हणाले.

हा अहवाल बीएफएसआय  क्षेत्राला आकार देणाऱ्या सायबरसुरक्षेविषयी  समग्र विश्लेषण प्रदान करतो. या उपक्रमाचे सहयोगी स्वरूप, आघाडीचे  सायबर सुरक्षा प्रदाते, राष्ट्रीय संस्था आणि वित्तीय क्षेत्रातील घटना प्रतिसाद पथकांना  एकत्र आणणे, डिजिटल जोखीम कमी करण्यासाठी सक्रिय, गुप्‍त तपास-चालित दृष्टिकोनाची निकड अधोरेखित करते.

डिजिटल थ्रेट रिपोर्ट म्हणजेच डिजिटल धोक्याची सूचना देणारा अहवाल 2024 बहुआयामी सायबर अंतर्दृष्टी प्रदान करणारा

डॉ. संजय बहल यांनी या प्रसंगी सांगितले की, “सायबर सुरक्षा ही केवळ वैयक्तिक घटकांचे संरक्षण करण्यासंबंधी  नाही तर ती संपूर्ण परिसंस्थेला सुरक्षित करण्याविषयी  आहे.

बीएफएसआयसाठी  डिजिटल धोके  अहवाल 2024  म्हणजे वित्तीय संस्था, नियामक आणि सुरक्षा व्यावसायिकांना सायबर धोक्यांविरुद्ध सक्रिय भूमिका घेण्यासाठी केलेले आवाहन आहे. या क्षेत्राला एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून केलेले हल्ले,  फसवणूक करण्‍यासाठी वापरलेल्या अत्याधुनिक युक्त्या आणि अनुपालन गुंतागुंतींमुळे वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हा अहवाल विकसित होत असलेल्या सायबर सुरक्षा परिप्रेक्ष्‍यामध्ये आगामी काळात शोध घेण्‍यासाठी  एक धोरणात्मक मार्गदर्शक म्हणून उपयोगी ठरणार आहे.

 

एसआयएसए विषयी माहिती:

एसआयएसए ही डिजिटल पेमेंट उद्योगासाठी एक जागतिक ‘फॉरेन्सिक्स’ म्हणजेच न्यायवैद्यक शास्त्राच्या आधारे कार्यरत असलेली  सायबर सुरक्षा उपाय कंपनी आहे. या कंपनीच्या कार्यावर  आघाडीच्या संस्थांनी त्यांचे व्यवसाय मजबूत आणि सुधारात्मक सायबर सुरक्षा उपायांसह सुरक्षित करण्यासाठी विश्वास ठेवला आहे.

‘डिजिटल थ्रेट रिपोर्ट’ म्हणजेच डिजिटल धोके अहवाल 2024 साठी, येथे क्लिक करावे.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2119882) Visitor Counter : 23