सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या गांधीनगरमध्ये इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (ईफ्फको -IFFCO)  कलोल प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात केंद्रीय गृहआणि  सहकार मंत्री अमित शहा झाले सहभागी


अमित शहा यांच्या हस्ते बीयाणं संशोधन केंद्राची (Beej Anusandhan Kendra) पायाभरणी

Posted On: 06 APR 2025 4:26PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि  सहकार मंत्री अमित शहा आज गुजरातच्या गांधीनगरमध्ये इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (ईफ्फको -IFFCO)  कलोल प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी झाले . यावेळी त्यांनी बीयाणं संशोधन केंद्राच्या (Beej Anusandhan Kendra) बांधकामाची पायाभरणीही केली.

IMG_1106.JPG

यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले. आज ईफ्फकोच्या कलोल प्रकल्पाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असतानाच, बीयाणं संशोधन केंद्राच्या बांधकामाचा पाया रचला जात असल्याच्या योगायोगाचा उल्लेख त्यांनी केला.  जेव्हा सहकारी आणि कॉर्पोरेट मूल्ये एकत्रित येऊन काम करतात तेव्हा कशा रितीने अविश्वसनीय निकाल हाती येतात, हीच बाब ईफ्फकोच्या 50 वर्षांच्या गौरवशाली प्रवासातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. इफ्फकोने संशोधन आणि विकास, विपणन, ब्रँडिंग आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याशी संबंधित सर्व बाबी यशस्वीपणे हातळल्याचे त्यांनी नमूद केले.

CR3_9601.JPG

सद्यस्थितीत भारत आता अन्नधान्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे आणि या यशात इफ्फकोचा  मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. इफ्फकोने शेतकऱ्यांना खतांशी जोडले आहे आणि त्यानंतर खतांना सहकार संस्थांशी जोडण्याचे कामही केले असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

इफ्फकोने नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांच्या क्षेत्रात भारताच्या सहकार क्षेत्राला जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. आज इफ्फकोद्वारा उत्पादित नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खते जगभरात पोहोचू लागली असल्याची माहिती त्यांनी दिली.

IMG_1061.JPG

आपल्या सहकार संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्राथमिक सहकारी संस्था आणि सहकारी दुग्ध संघांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संगणकीकरणावर काम केले आहे आणि या माध्यमातून प्राथमिक कृषी पत संस्थांना (PACS) नवीन उपक्रमांशी जोडणे आणि दुग्धव्यवसायाच्या संपूर्ण आर्थिक चक्राचा सहकार व्यवस्थेत अंतर्भाव करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119566) Visitor Counter : 22