सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील महिला आणि पुरुष 2024: निवडक निर्देशक (इंडिकेटर्स) आणि विदा (डेटा)" या अहवालाचे प्रकाशन
Posted On:
06 APR 2025 8:47AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) "भारतातील महिला आणि पुरुष 2024: निवडक निर्देशक आणि विदा" या शीर्षकाच्या त्यांच्या प्रकाशनाची 26 वी आवृत्ती प्रकाशित केली आहे.
हा अहवाल, भारतातील लिंग निहाय परिस्थितीचा (लोकसंख्येचा) सर्वंकष आढावा घेतो. यामध्ये, विविध मंत्रालये/विभाग/संस्थांकडून मिळवलेला, लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहभाग आणि निर्णयक्षमता अशा प्रमुख क्षेत्रांमधील निवडक निर्देशक (इंडिकेटर्स) आणि विदा (डेटा) सादर करतो. ही माहिती, अधिकृत आकडेवारीचा वापर करून, शहरी-ग्रामीण वर्गीकरण आणि भौगोलिक प्रदेशांनुसार लिंगनिहाय असते. यामुळे महिला आणि पुरुषांसमोरील आव्हाने आणि संधींचे अगदी बारकाईने आकलन होते.
"भारतातील महिला आणि पुरुष 2024: निवडक निर्देशक आणि विदा" हा अहवाल, एक महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणून काम करतो. स्त्री-पुरुष समानतेतील प्रगती आणि समाजात रुतून बसलेल्या विषमतेवर, हा अहवाल प्रकाश टाकतो. सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे विश्लेषण आणि समाजप्रवाह अधोरेखित करणाऱ्या या अहवालामुळे, धोरणकर्ते, संशोधक आणि इतर भागधारकांना शाश्वत आणि समावेशक विकासाला चालना देणारी लिंगनिहाय-संवेदनशील धोरणे विकसित करण्यास बळकटी मिळते.
"भारतातील महिला आणि पुरुष 2024: निवडक निर्देशक आणि विदा" हा अहवाल मंत्रालयाच्या, (https://mospi.gov.in/) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या पुस्तकातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सातत्याने उच्च स्त्री पुरुष गुणोत्तर (जीपीआय) आढळले आहे, जे महिलांचे मोठे प्रमाण दर्शवते. उच्च प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर चढ-उतार दिसून येतात, परंतु ते समानतेच्या जवळपास आहेत.

15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट-एलपीएफआर अर्थात श्रमिक बळ सहभाग दरा मध्ये सर्वसाधारण परिस्थितीत 49.8 % (2017-18) वरून 60.1% (2023&-24) पर्यंत वाढ झाली आहे.

एकूण बँक खात्यांपैकी महिलांची खाती 39.2% आहेत आणि ती एकूण ठेवींमध्ये 39.7.% योगदान देतात. ग्रामीण भागात हेच प्रमाण, एकूण खातेधारकांपैकी 42.2% , असे सर्वाधिक आहे.
गेल्या काही वर्षांत डीमॅट खात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, जी शेअर बाजारात वाढत्या सहभागाचे संकेत देते. 31 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत, डीमॅट खात्यांची एकूण संख्या 33.26 दशलक्ष वरून 143.02 दशलक्ष झाली आहे, जी चार पटीने जास्त आहे. पुरुष खातेधारकांची संख्या महिला खातेधारकांपेक्षा सातत्याने जास्त आहे, परंतु महिलांच्या सहभागातही वाढ होत आहे. 2021 मध्ये पुरुष खातेधारकांची संख्या 26.59 दशलक्ष होती, ती 2024 मध्ये 115.31 दशलक्ष इतकी वाढली आहे, तर याच काळात महिला खातेधारकांची संख्या 6.67 दशलक्ष वरून 27.71 दशलक्ष झाली आहे.

2021-22, 2022-23 आणि 2023-24 या काळात उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील महिला मालक असलेल्या आस्थापनांच्या टक्केवारीत वाढ दिसून आली आहे.
महिला मतदार नोंदणीमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीसह, मतदारांची एकूण संख्या 1952 मधील 173.2. दशलक्ष वरुन 2024 मध्ये 978 दशलक्ष झाली. महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण वर्षानुवर्षे बदलते होते. 2019 मध्ये ते 67.2 % पर्यंत पोहोचले परंतु 2024 मध्ये ते किंचित कमी होऊन 65.8% झाले. मतदानातील स्त्री-पुरुष प्रमाणातील फरक कमी झाला आहे. 2024: मध्ये महिला मतदान, पुरुषांपेक्षा जास्त आहे.

गेल्या काही वर्षांत, डीपीआयआयटीने मान्यता दिलेल्या नवउद्योगांच्या (स्टार्टअप्स) संख्येत वाढ झाली आहे ज्यामध्ये किमान एक महिला संचालक आहे. हे प्रमाण महिला उद्योजकतेतील सकारात्मक कल-प्रवाह दर्शवते. अशा स्टार्टअप्सची एकूण संख्या 2017 मधील 1,943 वरून 2024 मध्ये 17,405 वर पोहोचली आहे.
***
S.Tupe/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119519)
Visitor Counter : 46