गृह मंत्रालय
केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड मध्ये बस्तर पंडूम कार्यक्रमाला केले संबोधित
मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध
Posted On:
05 APR 2025 6:31PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगड मधल्या दंतेवाडा इथे बस्तर पंडूम कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले.
त्यांनी सांगितले की, बस्तर पंडूमला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी मोदी सरकार काम करत आहे. सर्व देशांच्या राजदूतांना बस्तरच्या दौऱ्यावर आणून बस्तरची परंपरा, संस्कृती आणि कला जगासमोर मांडण्याचे कार्य सुरु आहे.
बस्तरला विकास हवा आहे म्हणून सर्व नक्षलवाद्यांना शस्त्र त्यागून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी बस्तरला सर्व काही द्यायला तयार आहेत, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बस्तरमध्ये शांतता असेल.
त्यांनी पुढे सांगितले की कोणालाही हानी पोहचवण्याचा कोणाचाही हेतू नाही, त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात यावे. भारत सरकार आणि छत्तीसगड सरकार त्यांना संरक्षण देतील.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले की नक्षलवादी त्यांच्या शस्त्रांनी संपूर्ण बस्तरचा विकास थांबवू शकत नाहीत.
त्यांनी सांगितले की मागील सरकारांनी "गरीबी हटाओ" ही घोषणा केली पण 75 वर्षांत गरीबांच्या विकासासाठी काहीच केले नाही.
अमित शहा यांनी सांगितले की विकासासाठी हातात बंदूक नव्हे तर संगणक हवा, आणि आयईडी-ग्रेनेड नव्हे तर पेन हवे हे ज्यांना समजले आहे त्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने 2025 मध्ये आतापर्यंत 521 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर 2024 मध्ये 881 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत.
शहा यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की जे नक्षलवादी शस्त्र खाली ठेवतील, ते मुख्य प्रवाहात येऊन प्रगती करू शकतील, पण जे हिंसाचाराचा मार्ग निवडतील त्यांच्यावर सुरक्षा यंत्रणांमार्फत कठोर कारवाई केली जाईल. मोदी सरकार मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119390)
Visitor Counter : 16