गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-2 ला मंजुरी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 6:44PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-2 ला मंजुरी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले. या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स मंचावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम आपल्या सीमावर्ती गावांना प्रगती आणि विकासाच्या केंद्रांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक क्रांतिकारी माध्यम आहे. या दृष्टिकोनाला आणखी पुढे नेत मोदी सरकारने आज ₹ 6,839 कोटींच्या एकूण खर्चासह व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-2 ला मंजुरी दिली आहे, असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय भू-सीमेवरील गावांना शाश्वत उपजीविकेसाठी पुरेशा सुविधा, उच्च राहणीमान आणि अधिक मजबूत सुरक्षेसह व्यापक विकास प्रारूपात परिवर्तित करेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
***
S.Kakade/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2119088)
आगंतुक पटल : 51