पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
04 APR 2025 3:21PM by PIB Mumbai
महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पोस्ट केले आहे :
“महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल फार दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील पिडीतांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”
***
S.Kakade/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2118910)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam