निती आयोग
‘स्थानिक विकास योजनेत हवामानाशी जुळवून घेण्याला प्राधान्य’ या विषयावर नीती आयोगाने राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली
Posted On:
04 APR 2025 11:01AM by PIB Mumbai
‘स्थानिक विकास योजनेत हवामानाशी जुळवून घेण्याला प्राधान्य’ या विषयावर नीती आयोगाने राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेमध्ये धोरणनिर्माते, हवामान तज्ञ, नागरी समाज संस्था आणि विकास क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले होते, जेणेकरून पंचायत विकास योजनांमध्ये हवामान सुसह्यता (climate resilience) प्रभावीपणे समाविष्ट करण्याच्या रणनीतींचा शोध घेता येईल.
हवामान बदलातील आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सर्व ग्राम पंचायतींकडे योग्य ती साधने, माहिती व साधनसंपत्ती असण्याच्या आवश्यकतेवर या कार्यशाळेत भर देण्यात आला. हवामान बदलाशी जुळवून घेण्याची गरज ही एक पृथक प्रयोग म्हणून राबवण्याची गोष्ट नव्हे तर पंचायत स्तरावरील सर्व प्रकारच्या क्षेत्रीय योजनांमध्ये त्याचा समावेश असला पाहिजे, हे कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले. स्थानिक समुदाय पातळीवरील पारंपरिक ज्ञानाशी सांगड घालूनच हवामान प्रारूप तयार करायला हवे , तरच स्थानिक परिस्थितीशी अनुरूप अशा उपाययोजना यशस्वी करता येतील हे सांगण्यात आले.
पंचायती राज संस्थांमध्ये हवामान लवचिकता अंगिकारण्यावर व स्थानिक विकास संरचनेत हवामानानुरूप नियोजनाची सवय रुजवण्यावर भर दिला गेला. अतिविषम हवामानाची वाढती वारंवारता व त्याचा ग्रामीण उपजीविका पद्धती, शेती तसेच जलसुरक्षा यावर होणाऱ्या परिणामांबद्दल या कार्यशाळेत चर्चा झाली . त्याला तोंड देण्यासाठी नेमके नियोजन करताना ग्रामपंचायत पातळीवरील आकडेवारीचा सुयोग्य वापर झाला पाहिजे यावर भर देण्यात आला.
पंचायतींना त्यांच्या विकास नियोजनात क्षमतावर्धन करून हवामानानुरूप हाताळणी करण्याची गरज दर्शवली गेली. दीर्घकालीन व बदलांशी जुळवून घेत केलेल्या नियोजनासाठी तसेच पंचायतीच्या क्षमतावर्धनासाठी विविध साधने व संरचना सादर केल्या गेल्या. हवामान लवचिकतेला प्राधान्य देणाऱ्या सध्याच्या योजना व कार्यक्रमांची व्याप्ती वाढवून त्यांचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याची गरज सहभागींनी व्यक्त केली.
विविध राज्यातील पंचायतींमध्ये सुरु असलेल्या उत्तम पद्धतींची माहिती दिली गेली तसेच प्रभावी हवामान कृतीसाठी एकमेकांकडून बारीकसारीक उपाययोजनांचे आदानप्रदान होणे किती महत्वाचे आहे यावर भर दिला गेला. केवळ हवामान लवचिकतेच्या पुरस्कारापेक्षाही स्थानिक पातळीवरील हवामानाशी सक्रियपणे जुळवून घेणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करण्यात आले. यामध्ये हवामान चढउतारांची सखोल माहिती करून घेऊन व आपत्ती निवारण तयारी राखत विकास घडवण्यासाठी पंचायतींची भूमिका महत्वाची ठरत असते.
हवामानबदलाशी जुळवून घेत ग्रामीण उपजीविका सुरु राहण्यासाठी पंचायतस्तरावरील सर्व हितधारकांचा सहभाग गरजेचा असल्याचे यातून निदर्शनास आले. पंचायतीच्या नेतृत्वाखाली हवामान कृतीत संस्थागत क्षमता वर्धन व नवोन्मेष प्रोत्साहन महत्वाचे आहे. हवामान बदलाशी जुळवून घेत केलेल्या स्थानिक सुशासनामुळे भारताला अधिक शाश्वत व लवचिक ग्रामीण विकास प्रारूप तयार करता येईल.
***
SonalT/Uma/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118690)
Visitor Counter : 24