दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा 2023-24 वर्षाचा वार्षिक अहवाल.
Posted On:
04 APR 2025 11:52AM by PIB Mumbai
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा 2023-24 वर्षाचा वार्षिक अहवाल, ज्यामध्ये प्राधिकरणाच्या क्रियाकलापांची माहिती, प्रमाणित लेखे आणि त्यावरील लेखापरीक्षण अहवाल 12 मार्च 2025 रोजी लोकसभा आणि 20 मार्च 2025 रोजी राज्यसभेत मांडण्यात आला आहे.
ट्रायच्या वार्षिक अहवालात धोरणे आणि कार्यक्रम, दूरसंचार क्षेत्र आणि प्रसारण क्षेत्रातील सामान्य सद्यस्थितीचा आढावा, ट्रायच्या कार्य आणि कामकाजांचा आढावा, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा 1997 च्या कलम 11 मध्ये निर्दिष्ट केलेल्या बाबींबाबत ट्रायची कार्ये आणि आर्थिक कामगिरीसह त्याच्या संघटनात्मक बाबींचा तपशील आहे.
सर्व सामान्यांच्या माहितीसाठी 2023-24 वर्षाच्या ट्रायच्या वार्षिक अहवालाची प्रत ट्रायच्या वेबसाइटवर (www.trai.gov.in) उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक स्पष्टीकरणासाठी, यतिंदर अग्रोही, सल्लागार (प्रशासन आणि आयआर) ट्राय यांचा संपर्क:- 011- 26769602 , ईमेल आयडी: advadmn@trai.gov.in वर संपर्क करता येईल.
***
SonalT/Raj/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118688)
Visitor Counter : 25