वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये GeM द्वारे 1 दशलक्षांहून अधिक नियुक्त्या
Posted On:
02 APR 2025 12:20PM by PIB Mumbai
डिजिटल खरेदीसाठीचा सरकारी मंच – Government e-Marketplace (GeM) ने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, सरकारच्या विविध संस्था आणि विभागांनी GeM च्या माध्यमातून 1 दशलक्षांहून (10 लाखांहून) अधिक मनुष्यबळ संसाधनांची नेमणूक केली आहे. हा टप्पा GeM च्या पारदर्शकता, नियमांचे पालन आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून सार्वजनिक खरेदीत क्रांती घडवण्याच्या बांधिलकीचा पुरावा आहे.
या यशाबद्दल बोलताना GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय भादू म्हणाले, “GeM च्या डिजिटल क्षमतांचा प्रभावी उपयोग करून, सरकारी खरेदीदारांसाठी विविध स्तरांवर आवश्यक असलेल्या सर्व सेवा खरेदीसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले ठिकाण म्हणून उदयास आले आहे. आमची मनुष्यबळ आऊटसोर्सिंग सेवा केवळ नेमणूक प्रक्रियेस सुलभ करत नाही, तर सेवा स्तर करार (Service Level Agreement) च्या माध्यमातून कामगार कायद्यांचे काटेकोर पालन देखील सुनिश्चित करते.”
GeM च्या मनुष्यबळ आऊटसोर्सिंग सेवेची काही प्रमुख वैशिष्ट्ये:
- कौशल्य, माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर आधारित संसाधने निवडण्याची लवचिकता
- सरकारी गरजांनुसार विशिष्ट भूमिकांसाठी विभागवार विशेष श्रेणी
- पारदर्शक किंमत संरचना, ज्यामध्ये किमान वेतन आणि निश्चित मानधनाचे पर्याय
- कायदेशीर नियमांचे पालन आणि सर्व पक्षांसाठी स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करणारा व्यापक सेवा स्तर करार (SLA) फ्रेमवर्क
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये GeM द्वारे 1 दशलक्षांहून अधिक मनुष्यबळ संसाधनांची नेमणूक ही गोष्ट सरकारच्या विविध विभागांमध्ये या प्लॅटफॉर्मवरील विश्वास व स्वीकार वाढत असल्याचे प्रतीक आहे.
***
SonalT/Surekha/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118685)
Visitor Counter : 14