श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओने दावा निपटारा प्रक्रिया केली सुलभ; ईपीएफ सदस्यांच्या जीवन सुलभतेसाठी आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभतेबाबत केल्या दोन प्रमुख सुधारणा
Posted On:
03 APR 2025 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
ईपीएफ सदस्यांसाठी जीवन सुलभता आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) त्यांच्या दाव्याच्या निपटारा प्रक्रियेत दोन प्रमुख सुलभीकरणे आणली आहेत. या उपाययोजनांमुळे दाव्याच्या निपटारा प्रक्रियेत लक्षणीयरीत्या सुलभता येईल तसेच दावे नाकारण्याबाबतीतील तक्रारी कमी होतील.
1.धनादेशाचे पान/ बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता काढून टाकणे
ईपीएफओने ऑनलाइन दावे दाखल करताना धनादेश किंवा बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता पूर्णपणे काढून टाकली आहे. सुरुवातीला काही केवायसी-अपडेट केलेल्या सदस्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही आवश्यकता शिथिल करण्यात आली होती. ही आवश्यकता काढून टाकल्याने, ईपीएफओच्या सुमारे 6 कोटी सदस्यांना तात्काळ फायदा होऊ शकेल, ज्यामुळे खराब-गुणवत्तेच्या/वाचता न येणाऱ्या अपलोडमुळे होणारे दावे नाकारण्याचे प्रमाण कमी होईल तसेच संबंधित तक्रारी कमी होतील.
2. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) सह बँक खात्याचे तपशील जोडण्यासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकणे
बँक खात्यांचे तपशील युएएनसह जोडण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने ईपीएफओ ने आता बँक पडताळणीनंतर नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकली आहे. त्यानुसार, नियोक्त्यांना 'व्यवसाय सुलभता' आणि सदस्यांना 'जीवन सुलभता' लाभावी, यादृष्टीने सदस्याच्या बँक खात्याच्या सीडिंग प्रक्रियेत बँक खात्याची पडताळणी मंजूर करण्याची नियोक्त्याची भूमिका आता काढून टाकण्यात आली आहे. याचा तात्काळ फायदा 14.95 लाखांहून अधिक सदस्यांना होईल, ज्यांच्या मंजुरी नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत.
* * *
S.Kane/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2118243)
Visitor Counter : 41