संरक्षण मंत्रालय
लष्कर कमांडर परिषदेला नवी दिल्ली येथे प्रारंभ
Posted On:
01 APR 2025 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
नवी दिल्लीत 1 ते 4 एप्रिल 2025 दरम्यान लष्कर कमांडर्स परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशाच्या एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परिषदेतील सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील तसेच बीज भाषण देतील. या सत्रात 'सुधारणांचे वर्ष' यावर केंद्रित भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचे एक सादरीकरण देखील केले जाईल. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. या परिषदेत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारताच्या वाटचालीवर तसेच 'सक्षम आणि सशक्त भारत' निर्माण करण्यासाठी सशस्त्र दलांच्या परिकल्पित भूमिकेवर आपले विचार प्रकट करतील.
भारतीय सैन्याच्या चपळ, अनुकूल, तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज सैन्याच्या ध्येयाशी सुसंगती साधत, प्रभावी निर्णय घेण्याच्या नवीन पद्धतींचा परिचय देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तज्ञांशी गहन चर्चा देखील करतील. या चर्चेत येणाऱ्या इतर मुद्द्यांमध्ये एकूण संघटनात्मक सहकार्य वाढवणे आणि फील्ड आर्मीचे प्रक्रिया सुलभ करणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामुळे फील्ड आर्मी अधिक लवचिक आणि प्रतिसादशील बनेल. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने त्यांच्या कल्याणाशी संबंधित मुद्द्यांवर देखील .या व्यासपीठावर चर्चा होईल.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117339)
Visitor Counter : 29