दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मियतेची जोडणी - एक महिना ऐकणे, शिकणे आणि पुढची वाटचाल करत राहण्याला समर्पित


भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या वतीने एप्रिल 2025 या ग्राहक सेवा महिन्याचा प्रारंभ

Posted On: 01 APR 2025 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

भारतातील आघाडीची सरकारी दूरसंचार सेवा प्रदाता, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या वतीने एप्रिल 2025 हा महिना  ग्राहक सेवा महिना म्हणून घोषित केला आहे. आत्मियतेची जोडणी (Connecting with Car) अशी या देशव्यापी उपक्रमाची संकल्पना असणार आहे. ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवेचा वाढता अनुभव देणे आणि आपल्या सेवा वापरकर्त्यांशी दृढ संबंध निर्माण करणे हा या  मोहीमेचा उद्देश आहे.

बीएसएनएलच्या सेवा उत्कृष्टतेवर भर देण्याचा नवा दृष्टीकोन अंगिकारला असून, त्याला अनुसरूनच ग्राहक प्रथम या दीर्घकालीन वचनबद्धतेचा भाग म्हणून, बीएसएनएलची सर्व मंडळे, व्यवसाय क्षेत्रे आणि युनिट्स या महिनाभर चालणाऱ्या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होतील.

ग्रामीण, शहरी, उपक्रम आणि किरकोळ अशा सर्वच विभागांतील ग्राहकांशी नव्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न या उपक्रमाअंतर्गत केला जाईल. याअंतर्गत खाली नमूद केलेल्या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे :

  • मोबाइल नेटवर्कची गुणवत्ता सुधारणे
  • एफटीटीएच (FTTH) आणि ब्रॉडबँडची विश्वासार्हता वाढवणे
  • लीस्ड सर्किट/एमपीएलएस (MPLS) ची विश्वासार्हता वाढवणे
  • देयक प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करणे
  • ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे

या सेवा महिन्यात, बीएसएनएल आपले संकेतस्थळ, समाज माध्यमे, ग्राहकांसाठेचे  समर्पित अर्ज आणि थेट संपर्क यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांचा वापर करून सक्रियपणे अभिप्राय संकलीत करेल. विशेष म्हणजे, हे सर्व अभिप्राय बीएसएनएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) कार्यालयाकडून (Office of the Chairman and Managing Director - CMD) एकत्रित करून त्याचा थेट आढावाही घेतला जाणार आहे.

"बीएसएनएलचा वाटचाल ही प्रत्येक ग्राहकाचे म्हणणे ऐकण्यावरच आधारलेली आहे. खऱ्या अर्थाने मेड-इन-भारत 4G नेटवर्क सुरू करणारा एकमेव दूरसंचार सेवा प्रदाते म्हणून, आम्ही स्वदेशीचा अभिमान बाळगत तसेच प्रामाणिकपणा, वेग आणि सक्षमतेने सेवा देण्याच्या वचनबद्धतेनेच पुढे वाटचाल करत आहोत - अर्थात ऐकणे, शिकणे आणि विकसित डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करत राहणे." — ए. रॉबर्ट जे. रवी, आयटीएस, सीएमडी, बीएसएनएल

बीएसएनएलच्या  मोबाइल, एफटीटीएच (FTTH), ब्रॉडबँड, लँडलाइन आणि उपक्रमांच्या सेवांचा लाभ घेत असलेल्या सर्व ग्राहकांनी त्यांचे अभिप्राय, अनुभव आणि सूचना cfp.bsnl.co.in या अधिकृत ग्राहक सेवा महिना पोर्टलद्वारे सामायिक करावेत असे आवाहन बीएसएनएलच्या वतीने केले जात आहे.

चला, एकत्र मिळून एक मजबूत, अधिक प्रतिसाद देणारी बीएसएनएल (BSNL) घडवूया 

#ConnectingWithCare #BSNL4Customer #CustomerServiceMonth

 

* * *

JPS/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117240) Visitor Counter : 20