गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हरियाणातील हिस्सार इथे महाराजा अग्रसेन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण, नवीन अतिदक्षता विभागाचे उद्घाटन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा कोनशिला समारंभ
Posted On:
31 MAR 2025 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज हरियाणातील हिस्सार इथे महाराजा अग्रसेन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले; तसेच नवीन अतिदक्षता विभागाचे उद्घाटन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा कोनशिला समारंभ शाह यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Y033.jpg)
आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारताची संस्कृती, मूल्ये आणि परंपरा समृद्ध करण्याचे व जोपासण्याचे काम हरियाणाच्या भूमीने प्राचीन काळापासून केले आहे. महाभारताच्या काळापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरही देशाच्या विकासातील हरियाणाचे योगदान इतर मोठ्या राज्यांपेक्षा खूप मोठे आहे.
अमित शाह म्हणाले की, या भव्य रुग्णालयात जवळपास 5 लाख लोकांना बाह्य रुग्ण सेवा मिळू शकते, 180 विद्यार्थी दरवर्षी वैद्यकीय शाखेची पदवी प्राप्त करू शकतात आणि रुग्णांना विविध प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सेवा मिळू शकतात. हे सगळे ओ. पी. जिंदाल यांनी या संस्थेचा पाया रचल्यामुळे शक्य झाले आहे. महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याबरोबरच नव्याने बांधलेले अतिदक्षता केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा कोनशिला समारंभही झाला असे त्यांनी नमूद केले. यामुळे या संस्थेने आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येते.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की हरियाणाचे अंदाजपत्रक जे आधी 37000 कोटी रुपयांचे होते ते आता नायब सिंग सैनी यांच्या सरकारच्या काळात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. 2004 ते 2014 या काळात हरियाणाला केंद्र सरकारकडून 41000 कोटी रुपये मिळाले तर मोदी सरकारने 2014 ते 2024 या काळात हरियाणा सरकारला 1 लाख 43 हजार कोटी रुपये दिले आहेत असे त्यांनी सांगितले. याबरोबरच 1 लाख 26 हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधा विकासाची कामे,72 हजार कोटी रुपयांचे रस्त्यांचे बांधकाम आणि 54 हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प हरियाणात साकार झाले अशी माहिती त्यांनी दिली.
* * *
S.Patil/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117076)