शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभमेळा 2025 च्या भावनेचा उत्सव साजरा करणाऱ्या अखिल भारतीय चित्रकला आणि पेंटिंग स्पर्धेचे निकाल जाहीर


भारतभरातून 68000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये नोंदवला सहभाग

Posted On: 31 MAR 2025 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मार्च 2025

 

श्रद्धा आणि परंपरेचा पवित्र संगम असलेला महाकुंभमेळा, जगातील सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा म्हणून ओळखला जातो. महाकुंभ मेळा भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पर्व मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या शाश्वत शोधाचे प्रतिनिधित्व करत होते. गहन तात्विक महत्त्व आणि चैतन्यशील सांस्कृतिक अभिव्यक्तींसाठी ओळखला जाणारा हा उत्सव लाखो लोकांना भक्ती, ज्ञान आणि एकतेच्या सामूहिक उत्सवासाठी एकत्र आणतो.

या पवित्र परंपरेचे सार कलेच्या माध्यमातून जाणून घेण्याच्या उद्देशाने तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (MoE) महाकुंभमेळा 2025 या संकल्पनेवर देशभरात अखिल भारतीय चित्रकला आणि पेंटिंग स्पर्धा आयोजित केली होती. देशभरातील केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मौलिकता आणि सर्जनशीलतेवर भर देऊन भव्य महाकुंभ, दिव्य महाकुंभ आणि एक भारत श्रेष्ठ भारत या तीन संकल्पनांवर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या मेळाव्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व पटवून देणे तसेच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मूल्ये समजून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेमुळे नव्या पिढीला विविधतेतील एकतेची भावना समजून घेता येईल आणि ती साजरी देखील करता येईल. या स्पर्धेचे निकाल 24 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठे संख्येने सहभाग घेतला, 1040 केंद्रीय विद्यालयांमधील 39,840 विद्यार्थी, 404 नवोदय विद्यालयांमधील 26,398 विद्यार्थी आणि 1,000 सीबीएसई शाळांमधील 2887 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावरील स्क्रीनिंगसाठी केव्हीएस, एनव्हीएस आणि सीबीएसईच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सर्वोत्तम प्रवेशिका पुढील दोन टप्प्यात निवडल्या गेल्या - प्राथमिक स्तरावरील प्रवेशिका नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या निवड समितीद्वारे निवडल्या आणि दुसऱ्या स्तरावरील प्रवेशिकांचे एनसीईआरटीच्या चयन समितीद्वारे मूल्यांकन, रेकॉर्ड आणि अंतिम केल्या गेल्या.

    

पेंटिंग आणि चित्रकला दोन्ही श्रेणीतील विजेत्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रांसाठी निवडण्यात आले. प्रत्येक श्रेणीतील पहिले बक्षीस 15,000 रुपये तर दुसरे आणि तिसरे बक्षीस अनुक्रमे 10,000 रुपये आणि 7,000 रुपये आहे. दोन्ही श्रेणींमध्ये प्रमाणपत्रे आणि गिफ्ट हॅम्पर्ससह दहा उत्तेजनार्थ बक्षिसे देखील दिली जातील.

महाकुंभमेळा 2025 च्या संकल्पनेवर आधारित अखिल भारतीय पेंटिंग आणि चित्रकला स्पर्धेत प्रत्येक श्रेणीतील पुरस्कार आणि बक्षिसांची यादी :

Drawing Competition

Painting Competition

Awards

Student Name

Address for Communication

CBSE/NVS/KVS

Awards

Student Name

Address for Communication

CBSE/NVS/KVS

I

VIVEK SHARMA

MAHESHWARI PUB SCHOOL VAISHALI NAGAR AJMER RAJASTHAN

CBSE

I

LAVANYA THAKUR

PM SHRI, KV NO.1, BINNAGURI CANT, WEST BENGAL

KVS

II

LAKSHARAJ JORWAJ

PM SHRI, NVS, KHERLI, POST BHANDAREJ, DISTRICT DAUSA, RAJASTHAN

NVS

II

MYRA GODWAJ

BHARAT RAM GLOBAL SCHOOL, INDRAPURM,GZBD,UP

CBSE

III

AVNEESH NAND

PM SHRI NVS, VILLAGE BAHUAR, DISTRICT: SONEBHADRA, UTTAR PRADESH

NVS

III

ANUSHKA DAS

KVS, BOLPUR, BRITTISADAN, PRANTIK, DISTRICT-BIRBHUM, WEST BENGAL

KVS

 

दहा उत्तेजनार्थ बक्षिसे ज्यांना प्रमाणपत्र आणि गिफ्ट हॅम्पर प्रदान केले जातील :

Drawing Competition

Painting Competition

Sl.No

Student Name

Address for Communication

CBSE/NVS

KVS

Sl. No

Student Name

Address for Communication

CBSE/NVS

KVS

1.

AJAY SUJIT KUMAR

PM SHRI SCHOOL JNV, VILLAGE POKHRAPUR, DISTRICT SOLAPUR, MAHARASHTRA

JNV

1.

SAANVI GOPAL

ATOMIC ENERGY CENTRAL SCH-5 ANUSHAKTHI NGR MR

CBSE

2.

AJESH MARKAM

JNV, PM SHRI SCHOOL, DANTEWADA, CHATTISGARH

NVS

2.

SHOBHIT KUMAR

JAYSHREE PERIWAL GLOBAL SCH JAGATPURA JAIPUR RJ

CBSE

3.

JAIDEEP SINGH

JNV, PM SHRI SCHOOL, BRINGKHERA, SHRI MUKTSAR SAHIB (PUNJAB)

JNV

3.

VANI DOGRA

PM SHRI, KV N0-2, KANGRA (H.P), VILLAGE BILHDER

KVS

4.

KHUSHI KUMARI

KVS, ASANSOL DISTRICT PASCHIM BURDWAN

KVS

4.

ARADHYA DIMARI

KV AUGUSTYAMUNI, RUDRAPRAYAG, UTTARAKHAND

KVS

5.

LAKSH

PM SHRI SCHOOL, KV KAPURTHALA CANTT.

KVS

5.

HANU

KVS DHARAMPURI, MP

KVS

6.

P. MOKSHITHA

KVS NO.2, CRS SETTIPALLI TIRUPUTI

KVS

6.

ISHAN PODDAR

NARULA PUBLIC SCHOOL MOGRA HOOGHLY WB

CBSE

7.

POOJA DURGADAS

PH SHRI KV, POST BOX 80, JALOGAON, MAHARSHTRA

KVS

7.

DEVASMITA KARMAKAR

PM SHRI, KV NO. 3, MAMUN CANTT. PATHANKOT

KVS

8.

PRATIK ROY

KV NO.2 DHANBAD

KVS

8.

SONAL SINGH CHAHAR

KVS NO. 3, AGAR AGRA CANTT. (UP)

KVS

9.

PRERNA S

KVS-2, DHANBAD

KVS

9.

RIYA YADAV

MODERN PUBLIC SCHOOL B BLK SHALIMAR BAGH DLI

CBSE

10.

RICKY SINGH KHWAIRAKPAM

KVS, NHPC, VIDUT VIHAR KOM, LOKTAK MANIPUR

KVS

10.

POONAM

KVS NO. 3, AGAR AGRA CANTT. (UP)

KVS

 

महाकुंभमेळा 2025 मधील अखिल भारतीय पेंटिंग आणि चित्रकला स्पर्धा, युवा वर्गाला या कालातीत परंपरेबाबतची त्यांची समज सर्जनशीलपणे व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. #NEP2020 मध्ये कल्पना केल्याप्रमाणे, सांस्कृतिक जागरूकता आणि कलात्मक अभिव्यक्ती हे समग्र शिक्षणाचा अविभाज्य भाग असून हे नवोदित कलाकार आपल्या सर्जनशीलतेद्वारे याचे उदाहरण जगासमोर मांडत आहेत. 

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117056) Visitor Counter : 23