माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्ह्ज बाजार (WAVES Bazaar) अंतर्गत विशेष सादरीकरणे आणि धोरणात्मक भागिदाऱ्यांच्या माध्यमातून जागतिक अस्तित्वाचा विस्तार होणार
Posted On:
31 MAR 2025 3:52PM by PIB Mumbai
मुंबई, 31 मार्च 2025
मुंबईत येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान जागतिक दृकश्राव्य शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) अर्थात वेव्ह्स परिषद होणार आहे. यानिमित्ताने माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment - M&E) उद्योगक्षेत्रासाठीच्या जागतिक पातळीवरील WAVES Bazaar (वेव्ह्स बाजार) या प्रमुख ई बाजारपेठेचेही आयोजन केले जाणार आहे. या बाजारपेठेचे हे पहिलेच पर्व असून, आपल्या पहिल्याच आवृत्तीत स्वतःची छाप सोडण्यासाठी ही बाजारपेठ सज्ज झाली आहे. वेव्ह्स शिखर परिषदेचाच एक महत्वाचा घटक असलेली ही बाजारपेठ परिषदेला समांतरपणेच 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे साकारली जाणार आहे. या बाजारपेठेत चित्रपट, दूरचित्रवाणी आणि AVGC (अॅनिमेशन, व्हीएफएक्स गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक एकत्र येतील, या बाजारपेठेमुळे या सर्वांना परस्पर सहकार्यासाठी, आशय सामग्रीच्या प्रदर्शनासाठी आणि आणि आपल्या व्यवसाय उद्योगांच्या विस्तारासाठीची अभूतपूर्व संधी मिळणार आहे.
भारताला आशय सामग्रीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या ध्येयाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून या वेव्ह्ज बाजारमध्ये अनेक विशेष विभाग असणार आहेत. यात व्ह्यूइंग रूम, मार्केट स्क्रीनिंग्ज, खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या बैठका तसेच बहुआयामी पीचरूम यांचा समावेश असेल. यामुळे उपयुक्त संपर्क प्रस्थापित होतील तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारीलाही चालना मिळेल.
व्ह्यूइंग रूम आणि मार्केट स्क्रीनिंग्ज : आशय सामग्रीच्या नव्या क्षितीजाचे अंतरंग उलगडणार
वेव्ह्ज बाजारमध्ये चित्रपट, मालिका आणि AVGC अंतर्गतच्या निवडक प्रकल्पांचे स्क्रीनिंग अर्थात खेळ आयोजित केले जातील. यामुळे खरेदीदार, विक्रीसाठीचे मध्यस्थ आणि वितरकांना नवीन तसेच आकर्षक आशय सामग्री सुलभतेने उपलब्ध होऊ शकेल. व्ह्यूइंग रूम अर्थात अशा खेळांच्या प्रदर्शनाची जागा ही या उद्योग क्षेत्रातील उद्योग व्यावसायिकांसाठी नवीन प्रकल्प पाहण्यासाठीचे आणि ते समजून घेण्यासाठीचे एक प्रकारचे समर्पित केंद्रच असणार आहे. तर मार्केट स्क्रीनिंग्ज मध्ये जागतिक प्रेक्षकांसमोर निवडक प्रकल्प सादर केले जाणार आहेत. यामुळे आशय सामग्रीचे वितरण, परवाना मिळवणे तसेच संयुक्त करारांच्या (syndication deals) संधी उपलब्ध होतील.
खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या बैठका : जागतिक सहकार्याला चालना
भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघाच्या (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI) फ्रेम्स कंटेंट मार्केटप्लेसच्या (Frames Content Marketplace) सहकार्याने, वेव्ह्ज बाजारमध्ये खरेदीदार आणि विक्रेता असा स्वतंत्र विभागही असणार आहे. याअंतर्गत निर्माते, स्टुडिओ, प्रसारणकर्ते आणि विविध व्यासपीठे अशा सर्व मुख्य भागधारकांना परस्परांसोबत बैठका घेण्याची संधी मिळेल. हा एक प्रकारचा ठराविक लक्ष्यित उद्देशाने होणारा व्यवसायिक ते व्यवसायिक (B2B) असा थेट संवाद असेल. यामुळे करार करणे, सह-निर्मिती आणि आशय सामग्रीचे अधिकार मिळवणे या सर्व प्रक्रियांना गती मिळेल. यातून परस्पर आंतरराष्ट्रीय सहकार्य ही मजबूत होईल तसेच या क्षेत्रातील उद्योजकांमधील परस्पर संबंधही अधिक दृढ होतील.
पिचरूम (Pitchroom) : कल्पना आणि गुंतवणूकदारांच्या मिलाफाचे केंद्र
या बाजाराअंतर्गतचा पिचरूम हा विभाग म्हणजे सर्जनशील कलाकार, चित्रपट दिग्दर्शक - निर्माते आणि आशय सामग्री क्षेत्रातील नवोन्मेषकांसाठीचे सर्वोत्तम व्यासपीठ असेल. या व्यासपीठाच्या माध्यमातून हे सर्वजनण गुंतवणूकदार, निर्माते आणि कमिशनिंग एडिटर (एखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक सर्जशील मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती) समोर आपल्या सर्वोत्तम कल्पना सादर करू शकतील. या पीचरुपची कल्पना ही उदयोन्मुख प्रतिभा आणि नवोन्मेषी प्रकल्पांना ठळकपणे मांडता येण्याच्या उद्देशाने साकारली गेली आहे, त्यामुळे हे पिचरूम नवीन आशय सामग्री विषयक प्रकल्प आणि संभाव्य सह-निर्मितीच्या प्रकल्पांचा प्रत्यक्ष प्रारंभ करून देणारे व्यासपीठ म्हणून कामी येणार आहे. यामुळे उद्योग क्षेत्रातील आपापल्या उद्योग व्यवसायासंबंधी निर्णय घेणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून सहभाग घ्यावा असाच हा उपक्रम असणार आहे.
उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांकडून वेव्ह्ज बाजारची प्रशंसा
उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी वेव्ह्ज बाजारच्या आशय सामग्री विषयक व्यापार आणि भागीदारीला प्रत्यक्ष साकारण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली आहे.
आम्ही वेव्ह्ज बाजारच्या अनेक विभागांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहोत असे, पॅनोरामा स्टुडिओजचे मुख्य व्यवसाय अधिकारी मुरलीधर छतवानी तसेच फिल्म अॅक्विझिशन अँड सिंडिकेशन विभागाचे प्रमुख रजत गोस्वामी यांनी म्हटले आहे. ही बाजारपेठ आमच्या प्रकल्पांच्या सादरीकरणासाठीचे, उपयुक्त सहकार्याची सुनिश्चिती करणारे, तसेच मनोरंजन उद्योग विश्वात आमच्या संस्थेचा विस्तार वाढवण्यासाठी एक अतुलनीय मंच उपलब्ध झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
जागतिक आशय सामग्री आणि धोरणात्मक भागिदारींचे प्रवेशद्वार
वेव्ह्ज बाजार ही आशय सामग्री निर्माते, खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी एक आमूलाग्र बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरणार आहे. या बाजारपेठेमुळे नवीन आशय सामग्रीच्या शक्यता चाचपडून पाहणे, भागीदारी स्थापित करणे आणि वितरण तसेच सह-निर्मितीच्या शक्यता तपासून घेणे शक्य होणार आहे. धोरणात्मक विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींसाठी खरेदीदार, विक्रेते, गुंतवणूकदार तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील उद्योग व्यावसायिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले गेले आहे.
नोंदणी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: WAVES Bazaar
वेव्ह्ज (WAVES) विषयी
जागतिक दृकश्राव्य शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) अर्थात वेव्ह्स परिषद ही माध्यमे आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणारी परिषद आहे. ही परिषद भारत सरकारच्या वतीने आयोजित केली गेली असून, महाराष्ट्रात, मुंबई इथे येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान ही परिषद होईल.
आपण उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ असाल अथावा गुंतवणूकदार, सर्जनशील कलाकार किंवा नवोन्मेषक असाल, तरी देखील अशा प्रत्येकाला या परिषदेच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठांशी जोडले जाण्याची, परस्पर सहकार्य स्थापित करण्याची, नवोन्मेषतेचे दर्शन घडवण्याची तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात योगदान देण्यासाठी अभिनव स्वरुपाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
वेव्ह्ज ही परिषद भारताच्या सर्जनशील सामर्थ्याचा विस्तार करणारी, आशय सामग्री निर्मात्यांचे केंद्र - बौद्धिक मालमत्ता आणि तांत्रिक नावोन्मेषाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करणारी परिषद ठरणार आहे. या परिषदे अंतर्गत प्रसारण, मुद्रण माध्यमे, दूरचित्रवाणी, नभोवाणी, चित्रपट, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यमे, समाज माध्यम व्यासपीठे, जनरेटिव्ह एआय अर्थात निर्मितीशील कृत्रिम बुद्धिमत्ता, संवर्धित वास्तविकता अर्थात ऑग्मेंटेड रिऍलिटी (AR), आभासी वास्तव (VR) आणि विस्तारित वास्तव (XR) या क्षेत्रांवर भर दिला आहे.
तुमच्या मनात प्रश्न आहेत? त्यावर इथे उत्तर मिळेल.
PIB Team WAVES द्वारे वेव्ह्ज (WAVES) विषयी केल्या जाणाऱ्या नवीन घोषणांबद्दल अद्ययावत रहा.
WAVES वेव्ह्जसाठी आत्ताच नोंदणी करा.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117024)
Visitor Counter : 32
Read this release in:
Odia
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam