उपराष्ट्रपती कार्यालय
ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा संदेश
Posted On:
30 MAR 2025 8:23PM by PIB Mumbai
ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी, आपल्या देशाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
ईद हा आपल्या सांस्कृतिक विविधतेतून आणि एकजुटीच्या सामाईक धाग्यातून मिळणाऱ्या ताकदीची आठवण करून देणारा सण आहे. या पवित्र दिवसाचे सार उत्सवाच्या पलीकडे खूप अधिक आहे, ते आपल्या लोकशाहीच्या विविधतेचा आधारस्तंभ असलेल्या एकता, करुणा आणि परस्पर आदराच्या संवैधानिक आदर्शांचे प्रतीक आहे.
ईदच्या निमित्ताने, सद्भाव आणि एकतेची भावना जपूया आणि सामूहिक सौहार्दाच्या खोलवर रुजलेल्या भावनेचा उत्सव साजरा करूया. ईदचा हा उत्साह, आपल्याला या मूल्यांप्रति पुन्हा समर्पित होण्यासाठी प्रेरणादायी ठरो, जो राष्ट्र निर्माणाची दिशा प्रकाशमान करणारा आणि एक उल्लेखनीय, समृद्ध राष्ट्राच्या रुपात आमची एकजूट कायम ठेवेल.
***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116940)
Visitor Counter : 40