सहकार मंत्रालय
बिहारच्या पाटणा जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या 800 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध प्रकल्पांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी संपन्न
Posted On:
30 MAR 2025 4:20PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री. अमित शाह, यांच्या हस्ते आज बिहारमधील पाटणा जिल्ह्यातल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या 800 कोटी रुपये मूल्यांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या समारंभाला बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
LAA0.JPG)
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते बिहारमध्ये आज उद्घाटन आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये, जगातल्या सर्वात मोठ्या खाद्यान्न साठवणूक योजनेअंतर्गत एकंदर पंचवीस पॅक्समध्ये बासष्ट हजार पाचशे मेट्रीक टन साठवणूक क्षमता विकसित करण्यासाठी 83.16 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या पायाभरणीचा समावेश होता. त्याशिवाय, गृह विभागाच्या, 181.14 कोटी रुपये खर्चाच्या, 133 पोलिस इमारतींच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत 109.16 कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांचीही आज पायाभरणी करण्यात आली. त्याशिवाय पाटणा इथे दीप नारायण सिंग प्रादेशिक सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या 27.29 कोटी खर्चून बांधलेल्या वसतिगृहाचे उद्घाटनही करण्यात आले.
BTHT.JPG)
एकात्मिक सहकारी विकास प्रकल्पांतर्गत 46 लाख रुपये खर्चून बांधलेल्या मखाना प्रक्रिया आणि विपणन केंद्र आणि 2.27 कोटी खर्चून बांधलेल्या 11 धान्य गोदामांचे उद्घाटनही आज करण्यात आले. त्याचबरोबर नागरी गृहनिर्माण आणि विकास विभागाच्या अमृत-1 प्रकल्पाअंतर्गत 421.41 कोटी रुपये खर्चाच्या एकूण पाच पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांचंही उद्घाटन आज करण्यात आले.

***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2116878)
Visitor Counter : 50