वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीएम गतीशक्ती अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 90 व्या बैठकीत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन
रस्ते, रेल्वे व मेट्रो प्रकल्पांचे एनपीजी ने केले मूल्यांकन
Posted On:
27 MAR 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
रस्ते, रेल्वे व मेट्रो यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी आज नेटवर्क नियोजन गटाची (NPG) 90 वी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्यानुसार (PMGS NMP) बहुआयामी दळणवळण व माल साठवणूक कार्यक्षमता याबाबतच्या चर्चेवर भर देण्यात आला.
NPG ने पाच प्रकल्पांचे (दोन रस्ते, दोन रेल्वे व एक मेट्रो) मूल्यांकन केले. यामध्ये हे प्रकल्प एकात्मिक बहुआयामी पायाभूत सुविधा, शेवटच्या आर्थिक व सामाजिक जंक्शनपर्यंत दळणवळणाची सुविधा आणि वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थांचा समन्वय या पीएम गतीशक्ती तत्त्वांशी सुसंगत आहेत का तपासण्यात आले. या प्रकल्पांमुळे माल साठवण क्षमता वाढणे, प्रवासाचा वेळ कमी होणे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत महत्त्वाचे सामाजिक आर्थिक लाभ पोहोचणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांचे मूल्यांकन व अपेक्षित परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
- NH-165 या राष्ट्रीय महामार्गावरील आकिवीडू ते दिग्मारू रस्त्याचे पेव्हड शोल्डरसहित चौपदरीकरण
- NH-754K राष्ट्रीय महामार्गावरील लखपत ते संतलपूर रस्त्याचे पेव्हड शोल्डरसहित दुपदरीकरण
- जयपूर केओन्झार रस्ता ते धामरा बंदर दरम्यान ब्रॉड गेज रेल्वेमार्गाचे बांधकाम
- लमडिंग-तिनसुखिया-दिब्रूगढ रेल्वे रुंदीकरण प्रकल्पाअंतर्गत फुर्केटिंग – नवीन तिनसुखिया रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण
गृहबांधणी व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA)
- नॉयडा सेक्टर 142 ते बोटॅनिकल गार्डन (नॉयडा) मेट्रो रेल्वे प्रकल्प
पीएम गतीशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याशी सुसंगत असे हे पायाभूत सुविधा प्रकल्प दळणवळणामध्ये लक्षणीय सुधारणा आणतील, मालसाठवणुकीतही सुधारणा होईल आणि क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय आर्थिक विकासतही योगदान देतील. उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सहसचिव पंकज कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
* * *
S.Patil/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115987)
Visitor Counter : 42