संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी बनावटीच्या दहाव्या अम्युनिशन कम टॉर्पेडो कम मिसाईल (एसीटीसीएम) बार्ज, एलएसएएम 24 (यार्ड 134) चा लोकार्पण सोहळा संपन्न

Posted On: 27 MAR 2025 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मार्च 2025

 

मेसर्स सूर्यदिप्त प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे येथे 26 मार्च 2024 रोजी दहाव्या एसीटीसीएम बार्ज, एलएसएएम 24 (यार्ड 134) चा लोकार्पण सोहळा पार पडला. पाणबुडी देखरेख पथकाचे (एसओटी) एसपीएस, कमोडोर राहुल जगत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) शिपयार्ड, मेसर्स सूर्यदिप्त प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांच्याबरोबर 05 मार्च 2021 रोजी इलेवन (11) अम्युनिशन कम टॉर्पेडो कम मिसाईल बार्ज, अर्थात दारुगोळा आणि टॉर्पेडो क्षेपणास्त्र सज्ज तराफा च्या बांधकामा बाबतचा करार झाला होता.

शिपयार्डने अनुक्रमे इंडियन शिप डिझाईन फर्म आणि इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) यांच्या सहकार्याने या बार्जची रचना आणि निर्मिती केली आहे. या बार्जची सागरी क्षेत्रातील पात्रता तपासण्यासाठी विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत (एनएसटीएल) मॉडेल चाचणी घेण्यात आली होती. शिपयार्डने आतापर्यंत अकरा पैकी नऊ बार्ज यशस्वीपणे वितरित केले असून, भारतीय नौदल आपली ऑपरेशनल (परिचालन) क्षमता सुधारण्यासाठी त्याचा प्रभावीपणे वापर करत आहे.

हे बार्ज भारत सरकारचे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचे ध्वज अभिमानाने धारण करत आहेत.

 

* * *

JPS/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115680)