कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
2015 ते 2024 दरम्यान पीएमकेव्हीवाय योजनेअंतर्गत 1,60,33,081 उमेदवारांना प्रशिक्षित/अभिमुख करण्यात आले आहे
Posted On:
26 MAR 2025 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2025
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एम एस डी ई) 2015 पासून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पी एम के व्ही वाय) ही महत्त्वाकांक्षी योजना देशभरातील तरुणांना कौशल्य विकासाचा लाभ करून देण्यासाठी अल्प प्रशिक्षण (एस टी टी) तसेच पूर्व शिक्षणाची ओळख (आर पी एल) द्वारे कौशल्यवृद्धी आणि पुनर्कौशल्य यासाठी राबवत आहे. पी एम के व्ही वाय योजनेअंतर्गत 2015 मध्ये आरंभ झाल्यापासून ते 31.12.2024 पर्यंत एकूण 1,60,33,081 उमेदवारांना प्रशिक्षित/अभिमुख करण्यात आले.
आर्थिक वर्ष 2015-16 ते आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान राबविलेल्या पी एम के व्ही वाय 1.0, पी एम के व्ही वाय 2.0 पी एम के व्ही वाय 3.0 या पहिल्या तीन आवृत्त्यांमध्ये पी एम के व्ही वाय च्या अल्पकालीन प्रशिक्षण (एस टी टी ) घटकांतर्गत करण्यात आलेल्या नियुक्त्यांचा मागोवा घेण्यात आला. पी एम के व्ही वाय 3.0 पर्यंत एसटीटी प्रमाणित उमेदवारांचा नोंदवलेला नियुक्ती दर 43% राहिला.
पी एम के व्ही वाय 4.0 अंतर्गत आपल्या प्रशिक्षित उमेदवारांना त्यांच्या विविध करिअर मार्गाची निवड करण्यासाठी सक्षम करणे आणि त्यांना त्यासाठी योग्य दिशा देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, कौशल्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता परिसंस्था एकत्रित करण्यासाठी स्किल इंडिया डिजिटल हब (एस आय डी एच) प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. पी एम के व्ही वाय 4.0 ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. पी एम के व्ही वाय 4.0 अंतर्गत, चालू आर्थिक वर्षासह (31.12.2024 पर्यंत) गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1244.52 कोटी रुपये वापरले गेले आहेत.
याशिवाय, देशभरात पीएम के व्ही वाय 4.0 ची यशस्वी अंमलबजावणी आणि विस्तार सुनिश्चित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. कौशल्यातील तफावत दूर करणे, रोजगारक्षमता सुधारणे आणि आर्थिक वाढीला पाठिंबा देणे हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- इंडस्ट्री 4.0, वेब 3.0, एआर/व्हीआर, हवामान बदल, वर्तुळाकार अर्थव्यवस्था, हरित अर्थव्यवस्था इत्यादी नवीन युगातील कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे;
- उमेदवारांना चांगल्या व्यावहारिक अनुभवासाठी ऑन-जॉब-ट्रेनिंग (ओजेटी) वर अधिक अवलंबून राहणे;
- पूर्व शिक्षण ओळख (आरपीएल) अंतर्गत पुनर्कौशल्य आणि कौशल्यवृद्धीवर भर देणे;
- उद्योगांसोबत भागीदारीमध्ये अभ्यासक्रम सुरू करून अभ्यासक्रमांमध्ये लवचिकता आणणे;
- राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (आयएनआय) / शाळा / महाविद्यालये / विद्यापीठे / केंद्र आणि राज्य सरकारी संस्था इत्यादी शैक्षणिक संस्थांसह उपलब्ध पायाभूत सुविधांचा बहु वापर;
- सेमीकंडक्टर, 5जी, एआय, ग्रीन हायड्रोजन, ईव्ही, सोलर मिशन, केअर, पर्यटन इत्यादी क्षेत्रातील क्लस्टर्सवर लक्ष केंद्रित करणारी राष्ट्रीय प्राधान्ये आणि धोरण घोषणांशी संरेखित प्रशिक्षण.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी आज राज्यसभेत एका बिगर तारांकित प्रश्नाच्या (क्रमांक: 3000) उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115571)
Visitor Counter : 20