श्रम आणि रोजगार मंत्रालय
दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण आणि विकास राष्ट्रीय मंडळाच्या 84 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान डॉ. मनसुख मांडविया भूषविणार
Posted On:
25 MAR 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
केंद्रीय कामगार, रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया, उद्या नवी दिल्ली येथे दत्तोपंत ठेंगडी दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण आणि विकास राष्ट्रीय मंडळाच्या नियामक समितीच्या 84 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. देशातील कामगारांच्या शिक्षण आणि कौशल्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पुनरावलोकन सुनिश्चित करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमाला कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव,विविध मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी,कामगार संघटना आणि मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेले, हे मंडळ 1958 सालापासून आपल्या 50 प्रादेशिक संचालनालयांद्वारे देशभरातील कामगारांचे सक्षमीकरण करण्यासाठी झटत आहे. ते संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मानव संसाधन आणि औद्योगिक विकासावर प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते, तसेच असंघटित आणि ग्रामीण कामगारांना सामाजिक सुरक्षाव्यवस्था आणि इतर विविध कामगार कल्याण योजना आणि कार्यक्रमांबद्दल शिक्षित करत असते.
बदलत्या कामाच्या परिस्थितीला प्रतिसाद देत, हे मंडळ कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांची विविध प्रमुख सरकारी योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी श्रमिक चौपाल आणि जागरुकता आणि नोंदणी शिबिरे आयोजित करते , जेणेकरून कामगारांना यांचा थेट लाभ मिळेल. याव्यतिरिक्त, कामगारांना कौशल्य,पुनर्कौशल्य आणि उच्च कौशल्य प्रदान करण्यासाठी मंडळ विविध संस्थांशी सहयोग करत असते.
राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद यांच्याकडून (NCVET) कडूनही दर्जा मिळविण्यासाठी हे मंडळ प्रयत्न करत आहे.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115101)
Visitor Counter : 18