वस्त्रोद्योग मंत्रालय
‘भारतातील हस्तकला’ या विषयावर सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एक प्रश्नमंजुषा करणार आयोजित
Posted On:
25 MAR 2025 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2025
‘कॉटेज एम्पोरियम’ किंवा ‘कॉटेज’ म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ, माय जिओव्ही (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मंत्रालय, भारत सरकार (https://quiz.mygov.in/quiz/quiz-on-ab-to-in-to-view) यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतातील कला" या विषयावर प्रथमच एक प्रश्नमंजुषा आयोजित करत आहे. युवावर्गाला केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ आणि भारताचा राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी कारागीर आणि विणकर समुदायाचे योगदान याविषयीच्या अद्ययावत घडामोडींची माहिती देण्याच्या उद्देशाने या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात येत आहे.
देशभरातील सर्व भारतीय नागरिक ("द कॉटेज"चे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती वगळून )या प्रश्नमंजुषेत 30 एप्रिल 2025 पर्यंत सहभागी होऊ शकतात,पहिल्या तीन विजेत्यांना "द कॉटेज" तर्फे बक्षीस दिले जाईल.त्याचबरोबर नागरिकांना MyGov प्लॅटफॉर्मवर प्रतिज्ञा (https://pledge.mygov.in/support-women-artisans/) घेण्यासाठी निमंत्रित केले जात असून पहिल्या 100 महिलांना एका कारागिराने बनवलेले स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येईल.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114876)
Visitor Counter : 30