माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भरघोस प्रतिसादासह वॅम! मुंबई 2025 चे यशस्वी आयोजन संपन्न

Posted On: 24 MAR 2025 7:08PM by PIB Mumbai

मुंबई, 24 मार्च  2025


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेच्या (MEAI) सहकार्याने मुंबईतील व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल या प्रशिक्षण संस्थेत 23 मार्च 2025 रोजी वॅम  [WAM - WAVES Anime & Manga Contest (वेव्ह्ज ॲनिमे आणि मंगा  स्पर्धा) या उपक्रमाचे आयोजन केले होते. वॅम हा उपक्रम म्हणजे वेव्ह्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेअंतर्गत  राबवल्या जात असलेल्या Create in India Challenges अर्थात भारतात निर्मिती करा या आव्हानात्मक स्पर्धा  उपक्रमांपैकी एक स्पर्धा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत मुंबईत आयोजित अलिकडच्याच सत्रामध्ये सुमारे 300 स्पर्धकांनी मंगा, वेबटून आणि ॲनिमे या तीन मुख्य वर्गवारीतल्या  स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला.  या उपक्रमाअंतर्गत आवाज आधारीत अभिनय कला प्रदर्शन (Voice Acting Competition) आणि रोमांचक कॉसप्ले स्पर्धा (सहभागी व्यक्ती आपले आवडते अॅनिमे, मंगा, चित्रपट, व्हिडिओ गेम, कॉमिक बुक किंवा मालिकांमधील पात्रांचे वेश परिधान करून त्यांची नक्कल करून दाखवता) या उपक्रमांचेही आयोजन केले गेले होते. आवाज आधारीत अभिनय कला प्रदर्शनात 34 स्पर्धक सहभागी झाले होते, तर कॉसप्ले स्पर्धेत 45 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

वॅम! मुंबई 2025 चे विजेते:

आवाज आधारीत अभिनय कला प्रदर्शन (Voice Acting Competition)

विजेता: चिंचकर गणेश संयोग

उपविजेते: अदिती जोशी आणि पायल विशाल

कॉसप्ले स्पर्धा

विजेता: कैझद शेषबर्दरन - ओकारुन या पात्रासाठी

द्वितीय क्रमांक : यश मोकल - मंकी डी. लुफी या पात्रासाठी

तृतीय क्रमांक : ईशा जोशी - रॉबिन या पात्रासाठी

मंगा प्रकार

विद्यार्थी विजेता : जय कुमार नागोरी

व्यावसायिक तज्ज्ञ  विजेता: हृदय बिस्वास

वेबटून प्रकार  

व्यावसायिक तज्ज्ञ  विजेती : ईशा चव्हाण

ॲनिमे प्रकार  

विद्यार्थी विजेता : चिन्मय नरोटे

व्यावसायिक तज्ञ विजेता: रुबेन साल्धना

मंगा, वेबटून आणि ॲनिमे वर्गवारीतील विजेत्यांना पेन टॅब्लेट, कलाविषयक साहित्य, अधिकृत वस्तू आणि रोख बक्षिसांसह इतर पारितोषिके दिली गेली.याव्यतिरिक्त,ॲनिमे वर्गवारीतील विजेत्यांना त्यांच्या पायलट एपिसोडसाठी  इंग्रजी, हिंदी आणि जपानी भाषेतील डबिंगची सुविधाही दिली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गतच्या वेबटून या वर्गवारीतील विजेत्यांना आपल्या मंचासोबत काम करण्याची संधी देणार असल्याची पृष्टीही टूनसूत्र या मंचाने केली आहे.

या उपक्रमाअंतर्गत आयोजित एका विशेष सत्रात उपस्थितांना सध्या विकासाच्या टप्प्यावर असलेल्या ट्रायो (TRIO) या भारतातील पहिल्या ॲनिमीची विशेष पहिली झलकही पाहण्याची संधी मिळाली.  या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील अनेक आघाडीच्या  व्यक्तीदेखील उपस्थित होत्या. यात  सुशील भसीन - अध्यक्ष, मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया; अभिषेक दत्ता - असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट - अ‍ॅक्विझिशन अँड प्रोग्रामिंग (किड्स क्लस्टर), स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड; सुमीत पाठक - अभिनेता, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, गुलमोहर मीडिया; अंकुर जवेरी - अभिनेता, व्हॉइस आर्टिस्ट आणि असोसिएशन ऑफ व्हॉइस आर्टिस्ट्सचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष; जझील होमावझीर - 2D अॅनिमेशन प्रोफेशनल आणि भारतातील पहिल्या मंगा - बीस्ट लीजनचे निर्माते; दक्षता पवार - कॉस्प्ले  कलाकार आणि MAGE चे संस्थापक यांचा समावेश होता. वॅमच्या मागील स्पर्धा  गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी आणि दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

अधिक माहितीसाठी: अंकुर भसीन; सचिव, मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याशी  +91 98806 23122 ; secretary@meai.in वर संपर्क केला जाऊ शकतो.

वेव्हज बद्दल

भारत सरकार 1  ते 4  मे 2025  दरम्यान मुंबईत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीचा एक ऐतिहासिक उपक्रम  ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेंमेंट  समिट’ (वेव्हज- अर्थात  जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद ) आयोजित करणार आहे. तुम्ही उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार, निर्माते किंवा नवोन्मेषक असलात तर, WAVES - एक जागतिक व्यासपीठ म्हणून - जागतिक माध्यम आणि मनोरंजन  जगताशी जोडले जाण्यासाठी, सहयोग, नवोन्मेष तसेच  योगदान देण्यासाठी महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करते.


भारताला जागतिक सर्जनशीलता केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनासह, वेव्हजचे उद्दिष्ट सर्जनशीलता, नवोन्मेष आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्यासाठी नवीन मानके स्थापित करणे आहे. या शिखर परिषदेत भारताची सर्जनशील शक्ती वाढेल, आशय  निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेषाचे केंद्र म्हणून त्याचे स्थान बळकट  होईल. प्रसारण, मुद्रित माध्यमे, टेलिव्हिजन, रेडिओ, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एक्सआर) यासारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर वेव्हजमध्ये  लक्ष केंद्रित केले जाईल.
काही प्रश्न आहेत का? येथे उत्तरे शोधा

या, आमच्यासोबत सामील व्हा ! WAVES साठी आत्ताच नोंदणी करा (लवकरच आपल्या भेटीला येत आहे!)


S.Kakade/T.Pawar/H.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2114550) Visitor Counter : 35