कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाच्या 11 व्या फेरीत 12 खाणींचा यशस्वी लिलाव

Posted On: 24 MAR 2025 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2025

कोळसा मंत्रालयाने 5 डिसेंबर 2024 रोजी व्यावसायिक खाणकामासाठी कोळसा खाणींच्या लिलावाची 11वी यशस्वी फेरी करुन कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रवासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले. याअतंर्गतच्या लिलावात एकूण बारा कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला. यामध्ये आठ पूर्णपणे उत्खनन केलेल्या खाणी आणि अंशतः उत्खनन केलेल्या चार कोळसा खाणींचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या दोन खाणींचाही समावेशही यात आहे.

या लिलावाचा खाणनिहाय निकाल खाली दिला आहे :

S. No.

Name of Mine

State

PRC (MTPA)

Geological Reserves (MT)

Closing Bid Submitted By

Reserve Price (%)

Final Offer (%)

1

Jawardaha North

Jharkhand

NA

510.00

Jharkhand Exploration and Mining Corporation Limited

4.00

10.00

2

Dahegaon/Makardhokra-IV

Maharashtra

0.6

121.00

Western Coalfields Limited

4.00

10.50

3

Saradhapur Jalatap East

Odisha

NA

3257.89

Jindal Steel And Power Limited

4.00

10.00

4

Namchik East

Arunachal Pradesh

0.67

22.165

Innovative Mines and Minerals Limited

4.00

90.25

5

Marwatola-II

Madhya Pradesh

NA

119.718

Singhal Business Private Limited

4.00

24.50

6

Namchik West

Arunachal Pradesh

0.34

8.802

Pra Nuravi Coal Mining Private Limited

4.00

21.50

7-8

Banai & Bhalumunda

Chhattisgarh

12

1376.0757

Jindal Power Limited

4.00

48.00

9

Sahapur East

Madhya Pradesh

0.7

63.363

Mineware Advisors Private Limited

4.00

20.25

10

Seregarha

Jharkhand

NA

187.290

Rungta Sons Private Limited

4.00

36.50

11

Vijay Central

Chhattisgarh

0.4

56.750

Rungta Sons Private Limited

4.00

48.50

12

Bhandak West

Maharashtra

0.75

36.178

New Era Cleantech Solution Private Limited

4.00

79.00

नव्याने लिलाव केलेल्या या खाणींमधून वार्षिक 3,330 कोटी रुपये इतका महसूल (अंशत: उत्खन्नन झालेल्या खाणी वगळून) मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे  2,319 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित होऊ शकेल तसेच 20,902 इतक्या रोजगाराच्या संधीही निर्माण होतील,त्यामुळे कोळसा क्षेत्र असलेल्या भागांच्या आर्थिक विकासात  महत्वपूर्ण योगदान मिळू शकेल.

वर्ष 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणकाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 125 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे, याची उत्पादन क्षमता वार्षिक 273.06 दशलक्ष टन इतकी आहे. या खाणी कार्यान्वित झाल्यानंतर देशांतर्गत कोळशाचे उत्पादन वाढायला आणि देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात मोठा हातभार लागू शकणार आहे. या खाणींमुळे देशाला वार्षिक 38 हजार 767 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकेल, त्यासोबतच 40 हजार 960 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होऊ शकेल आणि कोळसा उत्पादक क्षेत्राशी संबंधित 4 लाख 69 हजार 170 जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे.

व्यावसायिक कोळसा खाणींमधून होणाऱ्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 23-24 मध्ये कोळशाचे उत्पादन 12.55  मेट्रिक टन होते आणि आर्थिक वर्ष 24-25 मध्ये ते 22.35 मेट्रिक टन (आतापर्यंत) वाढले आहे,  म्हणजे उत्पादनात सुमारे 78.14 % वाढ झाली आहे.

कोळसा मंत्रालयाच्या या धोरणात्मक उपक्रमांमधून कोळसा क्षेत्राला देशाच्या आर्थिक विकासाला पुढे नेणारा एक प्रमुख घटक बनविण्यासाठी, कोळसा मंत्रालय समर्पण भावनेने कार्यरत असल्याचे  दिसून येत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे, कोळशाचा विपुल आणि शाश्वत पुरवठा सुनिश्चित करून, देशाच्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासोबतच, आर्थिक स्थैर्य वाढवण्याला तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यालाही हातभार लागत असून, या सर्व माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांनाही चालना मिळत आहे.


S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2114476) Visitor Counter : 42