कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
उद्योग-शैक्षणिक संस्था-सरकार भागीदारी आणि शिकाऊ उमेदवारीचा अंतर्भाव असलेल्या अभ्यासक्रमाद्वारे कौशल्य तफावतीच्या समस्या सोडवण्याची आवश्यकता : जयंत चौधरी
Posted On:
23 MAR 2025 3:57PM by PIB Mumbai
"आजच्या ज्ञानाधारित जगात, योग्य कौशल्य संच आपल्याला गुणवत्ता प्रदान करतो आणि राष्ट्रीय विकासही घडवतो" असे प्रतिपादन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी केले. चौधरी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत वडोदरा येथील गति शक्ती विद्यापीठाचा तिसरा वार्षिक तांत्रिक महोत्सव "एपिटोम 2025" ला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. "परिवहनाचा अर्थ आहे प्रत्येक कामाला गती देणे यामुळेच खऱ्या अर्थाने विकासाला देखील गती मिळते”, यावर चौधरी यांनी भर दिला. लॉजिस्टिक्सचे भविष्य हरित आणि डिजिटल आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा-चालित भविष्यसूचक देखभाल विकासाचा एक प्रमुख चालक असेल", असेही ते म्हणाले.

गती शक्ती विद्यापीठाने आपला तिसरा वार्षिक टेक-फेस्ट "एपिटोम'25" यशस्वीरित्या साजरा केला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात उद्योग तज्ञांची अर्थपूर्ण तांत्रिक सत्रे, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा आणि वास्तविक जगाच्या वापरासाठी पथदर्शी कल्पनांचे प्रदर्शन यांचा समावेश होता.
चौधरी यांनी लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेची भूमिका आणि पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन याचे महत्त्व विशद केले. मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स, एव्हिएशन, रेल्वे, सागरी इत्यादी क्षेत्रात देशाकडून होणारी गुंतवणूक तरुणांसाठी जागतिक करिअरचे मार्ग उघडत आहे. तथापि, संपूर्ण क्षेत्र (रेल्वे, विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स इ.) अत्यंत तांत्रिक स्वरूपाचे असल्याने, अत्यंत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. त्रुटी कमी करून कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने हे कुशल व्यावसायिक तयार करण्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकार यांनी समन्वयाने काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

गती शक्ती विद्यापीठाच्या "उद्योग-संचालित" दृष्टिकोनाचे कौतुक करताना चौधरी यांनी विद्यापीठाला पुनर्कौशल्य आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी एनएसटीआय बरोबर भागीदारी आणि मार्गदर्शन करण्याचा सल्ला दिला.
हा कार्यक्रम विचारांची देवाणघेवाण, दृढ सहकार्य वाढवणे, तरुण मनांना मार्गदर्शन करणे तसेच नवीन युतींचा शोध आणि निर्मिती करण्याचे केंद्र होते. या कार्यक्रमात विविध उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी आणि सामाजिक महत्त्वाच्या संस्थांनी केलेल्या संबोधनात, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मार्गाला बळकटी देण्यासाठी आणि स्वप्नपूर्तीकडे जाण्यासाठी तरुण मनांना विकसित करण्यात शिक्षण संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
"ट्रान्सपोर्ट 360: भूमी, वायू, समुद्र आणि त्या पलीकडे" या संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय तांत्रिक महोत्सवात या क्षेत्रातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांनी चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने सहभाग नोंदवला : दविंदर संधू (डीबी अभियांत्रिकी), सूरज छेत्री (एअरबस), अनिल कुमार सैनी (अल्स्टॉम), अँड्रियास फोर्स्टर (टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स), जया जगदीश (एएमडी), विनायक दीक्षित (यूएनएसडब्ल्यू ऑस्ट्रेलिया), प्रवीण कुमार (डीएफसीसीआयएल) आणि मेजर जनरल आर. एस. गोदारा यांचा उपस्थितांमध्ये समावेश होता.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2114217)
Visitor Counter : 36