महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 53.76 लाखाहून अधिक लाभार्थ्यांचा समावेश
Posted On:
19 MAR 2025 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2025
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 अनुसार केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनाच्या नियमित नोकरीत असलेल्यांशिवाय किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार त्यासारखे लाभ मिळत असणाऱ्या मातांशिवाय, इतर सर्व गरोदर महिला आणि स्तन्यदा माता, केंद्र सरकारने ठरविलेल्या मुदतीत किंवा हप्त्यांमध्ये किमान सहा हजार रुपयांची मदत मिळण्यास पात्र आहेत.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पात्र गरोदर महिला आणि स्तन्यदा माताना त्यांच्या गरोदरपणात व स्तनपानाच्या काळात रु 5000 चा मातृत्व लाभ देण्यात येतो. जननी सुरक्षा योजने(JSY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रुग्णालय समकक्ष प्रसूती साठी उरलेले अनुदान देखील देण्यात येते, त्यामुळे प्रत्येक महिलेला सरासरी रु 6000 मिळतात.
मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मिशन शक्ती अंतर्गत, 01-04-2022 पासून दुसऱ्या प्रसूतीत जर मुलगी असेल तरीदेखील मातेला रु 6000 चा मातृत्व लाभ दिला जातो .
अन्नसुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरोदर महिला आणि स्तन्यदा मातेसाठी पोषणाची गरज ओळखून गरोदरपणात व बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यांपर्यंत अंगणवाड्यांमार्फत मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणारी अन्न धान्ये सर्व राज्यांना गहू आधारित पोषण कार्यक्रमांतगत ( WBNP) उपलब्ध करून दिली जातात. ज्यात पूरक पोषण आहार म्हणून (गहू/तांदूळ/भरड धान्ये)ही सर्व धान्ये अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना अन्नसुरक्षा कायद्यानुसार (NFSA) मंजूर भावाने दिली जातात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या पोर्टल अनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या योजने अंतर्गत 53,76,728 महिलांना लाभ मिळाला.
ही माहिती महिला व बालकल्याण राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी आज राज्य सभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.
N.Chitale/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113057)
Visitor Counter : 42