रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रचंड गर्दी, प्रवाशांची मागणी तसेच होळी, दिवाळी, छठपूजा, उन्हाळी सुट्ट्या आणि महा कुंभ यांसारख्या विशेष प्रसंगी विशेष गाड्यांची व्यवस्था करुनही बहुतांश रेल्वे विभागांनी 90% हून अधिक वक्तशीरपणाची केली नोंद


होळी विशेष गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून वर्ष 2021-22 मध्ये 241 होळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या तर वर्ष 2024-25 मध्ये 1,107 होळी विशेष गाड्या धावल्या

Posted On: 18 MAR 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025


केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेला संबोधित केले. रेल्वेचा पायाभूत सुविधा विकास, वक्तशीरपणा, पर्यावरणीय शाश्वतता, निर्यात, रोजगार तसेच आर्थिक स्थितीसह भारतीय रेल्वेचे विविध पैलू त्यांनी अधोरेखित केले. भारतीय रेल्वेला आधुनिक, कार्यक्षम आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत वाहतूक व्यवस्थेचे रूप देऊन प्रवाशांचा अनुभव तसेच आर्थिक विकास अशा दोन्ही बाबतीत सुधारणा करण्याप्रती केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

रेल्वे परिचालनातील वक्तशीरपणाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी आज लोकसभेत सांगितले की प्रगत सिग्नलिंग यंत्रणा, वास्तव वेळेतील निरीक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित वेळापत्रक तसेच अंदाजावर आधारित देखभाल यांच्या स्वीकारातून भारतीय रेल्वेने 90% पेक्षा जास्त प्रमाणात वक्तशीरपणाचे दर्शन घडवले आहे. भारतीय रेल्वेच्या 68 विभागांपैकी 49 विभागांनी 80% हून अधिक वक्तशीरपणा दर्शवला आहे तर 12 विभागांनी 95% पेक्षा अधिक   वक्तशीरपणा गाठून प्रभावी कामगिरी केली आहे. या सुधारित कार्यक्षमतेमुळे रेल्वेगाड्यांचे परिचालन अत्यंत सुगम झाले असून प्रवासी तसेच मालवाहतूक अशा दोन्ही सेवांना त्याचा लाभ झाला आहे. सध्या, भारतीय रेल्वे विभागातर्फे देशभरात 4,111 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या, 3,313 पॅसेंजर गाड्या आणि 5,774 उपनगरी गाड्यांसह 13,000 हून अधिक प्रवासी गाड्या चालवल्या जातात. विशेष म्हणजे, सध्या देशभरात धावणाऱ्या एकूण गाड्यांची संख्या कोविड-पूर्व काळात धावणाऱ्या गाड्यांपेक्षा कितीतरी अधिक असून, यातून विश्वसनीयता तसेच सुधारित सेवा वितरणाप्रती रेल्वे विभागाच्या कटिबद्धतेचे दर्शन घडते.  

Sl no

Zone

Division

Punctuality (%)

1

ECOR

Waltair

82.6

2

WCR

Bhopal

84.1

3

SECR

Nagpur SECR

84.4

4

ECR

Pt. Deen Dayal Upadhyaya

85.4

5

ER

Howrah

85.7

6

ER

Asansol

86.1

7

SR

Chennai

86.5

8

ECR

Samastipur

86.7

9

CR

Bhusaval

87.4

10

SER

Ranchi

87.7

11

CR

Nagpur CR

87.8

12

ER

Malda

88.1

13

NFR

Rangiya

88.3

14

NCR

Agra

88.3

15

ECR

Sonpur

88.6

16

NR

Ferozpur

89.2

17

SCR

Vijayawada

89.5

 Divisions with more than 90 percent punctuality:

Sl no

Zone

Division

Punctuality (%)

1

NWR

Jaipur

90.9

2

ECR

Dhanbad

91

3

SR

Trivandrum

91.3

4

SWR

Hubli

91.6

5

NFR

Tinsukia

92.3

6

NR

Ambala

92.5

7

SCR

Nanded

92.5

8

SWR

Mysore

92.7

9

NFR

Katihar

92.7

10

WR

Mumbai Central WR

92.9

11

WR

Vadodara

93.2

12

CR

Solapur

93.5

13

NER

Izzat Nagar

93.6

14

SCR

Hyderabad

93.6

15

NFR

Lumding

93.6

16

SR

Tiruchchirapalli

93.8

17

SR

Salem

94.2

18

SCR

Guntakal

94.3

19

NFR

Alipur Duar

94.4

20

SWR

Bangalore

94.4

21

WR

Ahmedabad

95.1

22

SCR

Guntur

95.7

23

WCR

Kota

95.7

24

SR

Palghat

95.9

25

NWR

Jodhpur

96.1

26

NWR

Ajmer

97.1

27

WR

Rajkot

97.7

28

ER

Sealdah

98

29

NWR

Bikaner

98.1

30

WR

Ratlam

98.9

31

SR

Madurai

99.2

32

WR

Bhavnagar

99.6

सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने विक्रमी संख्येने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. गेल्या वर्षी होळीच्या काळात मोठ्या संख्येने वाढलेला प्रवाशांची सोय करण्यासाठी 604 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली तर उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात लोकांसाठी सुरळीत प्रवासाची सोय व्हावी म्हणून  13,000 विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्याच पद्धतीने, छठपूजा आणि दिवाळीच्या काळात 8,000 विशेष गाड्या चालवण्यात आल्या. महाकुंभ मेळाव्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास खात्रीलायकरित्या सुलभ व्हावा म्हणून भारतीय रेल्वेने 17,330 विशेष गाड्यांची व्यवस्था करून उल्लेखनीय प्रयत्नाचे दर्शन घडवले. यावर्षी फक्त होळीच्या सणासाठी चालवलेल्या 1,107 विशेष गाड्यांच्या सुविधेतून प्रवाशांची सोय आणि कार्यक्षम प्रवास व्यवस्थापन यांच्याप्रती भारतीय रेल्वेची अविचल बांधिलकी दिसून येते.

गेल्या चार वर्षांमध्ये होळी सणासाठी सुरु केलेल्या विशेष गाड्यांची यादी:

Year

2021-22

2022-23

2023-24

2024-25

Holi spl No

241

527

604

1,107

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचा देखील ठळक उल्लेख केला. जगातील सर्वात मोठ्या स्थानक विकास कार्यक्रमाअंतर्गत 129 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम याआधीच पूर्ण झाले असून उर्वरित स्थानकांपैकी अनेकांचे काम 2025-26 पर्यंत पूर्ण होऊन ही स्थानके कार्यरत होतील अशी माहिती त्यांनी दिली.

पर्यावरणीय शाश्वततेप्रती सरकारच्या कटिबद्धतेला अनुसरत भारतीय रेल्वेने वर्ष 2025 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे (व्याप्ती 1) महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यासह पर्यावरणाची शाश्वतता राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विद्युतीकरण, वनीकरण आणि पद्धतींच्या प्रकारात बदल करण्याच्या नीतींच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा अश्विनी वैष्णव यांनी पुनरुच्चार केला. भारतीय रेल्वे विभागासाठी शून्य उत्सर्जनाचा अर्थ रेल्वे ट्रॅक्शन, नॉन-ट्रॅक्शन परिचालन, वाहनांचे ताफे तसेच रेल्वे वसाहती आणि रुग्णालयांसारख्या पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांतून कार्बनचे उत्सर्जन काढून टाकणे अथवा त्याची भरपाई करणे असा आहे.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी निर्यातीला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की यामुळे रेल्वे तंत्रज्ञान आणि उत्पादन यांच्या बाबतीत भारतीय रेल्वेला जागतिक पातळीवर स्थान मिळाले. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांच्या अंतर्गत भारतीय रेल्वे विभागाने वंदे भारत गाड्यांच्या सुट्या भागांसह रेल्वेसाठी लागणारी इतर यंत्रे, उपकरणे आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील देशांना यशस्वीरित्या निर्यात केली. भारत जागतिक रेल्वेसंबंधी पायाभूत सुविधा विकासातील स्वतःची भूमिका बळकट करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये रेल्वे इंजिने तसेच डब्यांचा महत्वाचा पुरवठादार देश म्हणून देखील उदयाला आला आहे.  

देशभरातील लाखो लोकांचा लाभ करून देत रेल्वे प्रकल्पांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या लक्षणीय रोजगार संधी देखील केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केल्या. लोको पायलट, तंत्रज्ञ, स्टेशन मास्तर आणि रेल्वे मार्गांची देखभाल करणारे कर्मचारी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात राबवलेल्या भर्ती अभियानांसह रेल्वे स्थानक विकास, रेल्वे मार्गांचा विस्तार आणि नवीन रेल्वे प्रकल्पांच्या माध्यमातून तीन लाखांहून अधिक थेट रोजगार निर्माण झाले. रेल कौशल विकास योजनेसारख्या इतर उपक्रमांनी हजारो तरुण भारतीयांना रेल्वेशी संबंधित व्यापाराचे कौशल्य प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यायोगे त्यांची रोजगारक्षमता सुधारली आहे.

भारतीय रेल्वे विभागाच्या आर्थिक स्थितीविषयी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की कोविड काळादरम्यान अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले तरीही रेल्वेने आता सुदृढ वित्तीय स्थिती प्राप्त केली आहे. सध्या रेल्वे विभागाचे बहुतांश खर्च रेल्वेच्या स्वतःच्या महसुलातून केले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
 
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2112589) Visitor Counter : 33