सहकार मंत्रालय
राष्ट्रीय सहकारी डेटाबेस
Posted On:
18 MAR 2025 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मार्च 2025
सहकार मंत्रालयाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने एक व्यापक राष्ट्रीय सहकारी डेटाबेस (एनसीडी) तीन टप्प्यांत आधीच विकसित केला आहे. एनसीडी पोर्टल 08 मार्च, 2024 रोजी सुरु करण्यात करण्यात आले. सहकारी संस्थांचा डेटा संकलित करून, तो डेटाबेसमध्ये प्रविष्ट केला जातो आणि अद्ययावत केला जातो. सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी हे कार्य पार पाडतात. हा डेटाबेस देशभरातील 8.25 लाखांहून अधिक सहकारी संस्थांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.
पुढील संकेतस्थळावर एनसीडी पोर्टल सर्वांसाठी उपलब्ध आहे : https://cooperatives.gov.in. हा डेटाबेस धोरणकर्त्यांना ज्या भागांमध्ये सहकारी संस्था कमकुवत आहेत त्या क्षेत्रांसाठी सहकारी चळवळ बळकट करण्यात उपयोगी ठरू शकतो. एनसीडी मध्ये स्थान, सदस्यसंख्या, आर्थिक क्रियाकलाप आणि परस्परसंबंध यासारख्या विविध मापदंडांवर डेटा संकलित केला जातो.यामुळे सहकारी संस्थांची भौगोलिक पातळीवरील व्याप्ती आणि त्यामधील रिक्तता शोधण्यास मदत होते. समाविष्ट आणि समविष्ट नसलेल्याही ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
यासंदर्भात, लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सहकार मंत्री,अमित शहा यांनी ही माहिती दिली.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112427)
Visitor Counter : 30