पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.
पंतप्रधानांनी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या अत्यंत फलदायी चर्चेचे मनापासून केले स्मरण.
पंतप्रधानांनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान तुलसी गॅबार्ड यांच्याशी झालेल्या संवादाची आठवण करून दिली, सहकार्य बळकट करण्यातील त्यांच्या भूमिकेची केली प्रशंसा.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या प्रतिनिधीची ही पहिली भारत भेट विशेष महत्त्वाची - पंतप्रधान
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिल्या हार्दिक शुभेच्छा; या वर्षाच्या अखेरीस त्यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन.
Posted On:
17 MAR 2025 8:52PM by PIB Mumbai
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डी.सी. ला दिलेल्या भेटीचे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या अत्यंत फलदायी चर्चेचे मनापासून स्मरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या अमेरिका भेटीदरम्यान तुलसी गॅबार्ड यांच्याशी झालेल्या संवादाचाही उल्लेख केला. तसेच संरक्षण, महत्वपूर्ण तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी लढा आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यामध्ये सहकार्य मजबूत करण्यात गॅबार्ड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या प्रतिनिधीने भारताला दिलेली ही पहिली उच्चस्तरीय भेट असल्याने त्यांच्या भेटीचे विशेष महत्त्व असल्याचे मत पंतप्रधानांनी नोंदवले.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस आपल्यासह भारतातील 1.4 अब्ज लोक ट्रम्प यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहेत, असा संदेशही त्यांनी दिला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2112047)
Visitor Counter : 22