आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी महामारीविरोधात सज्जतेसंदर्भात आयोजित क्वाड कार्यशाळेचे केले उद्घाटन
Posted On:
17 MAR 2025 11:44AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंग पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे हिंद-प्रशांत क्षेत्रातील महामारी संबंधी तयारीसाठी आयोजित क्वाड(QUAD)कार्यशाळेचे उद्घाटन केले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या 3-दिवसांच्या कार्यशाळेचा उद्देश, जागतिक आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत आपला आराखडा तयार करणे, आरोग्य धोक्यांसाठी सज्ज रहाणे आणि लवचिकता वाढवत विकसित होत असलेल्या साथीच्या रोगांसाठी एकत्रित प्रतिसाद यंत्रणा सिद्ध करणे तसेच एक आरोग्य दृष्टीकोनाची अंमलबजावणी सुनिश्चित करत, मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याशी संबंधित अनेक यंत्रणांचा विविध क्षेत्रांतून विचार करून त्या मजबूत करणे हा आहे.

उपस्थितांना संबोधित करताना पटेल म्हणाल्या,की, "अलिकडच्या काळात उदयाला येत असलेल्या आणि वारंवार डोके वर काढणाऱ्या आरोग्य धोक्यांमुळे जागतिक आरोग्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी बळकट यंत्रणा उभी करणे, त्याबाबत दक्ष रहाणे यासाठी समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद यंत्रणेची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित होत आहे."
जागतिक साथीच्या रोगांवेळी सज्ज रहाण्यासाठी आणि प्रतिसाद प्रयत्नांना बळकटी देण्याप्रति भारताच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत, पटेल यांनी माहिती दिली की "भारताने महामारी निधीच्या स्थापनेसाठी 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स योगदान दिले आहे ज्याची तजवीज विशेषत: साथीच्या रोगांशी लढण्यासाठी केली गेली होती". “भारताने त्याच्या शाश्वत कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त 12 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचा संकल्प केला आहे”, असे ही त्यांनी पुढे सांगितले.

मंत्री पटेल म्हणाल्या, की भारताने अनेक डिजिटल आरोग्य उपक्रमांचे नेतृत्व केले आहे, आरोग्य सेवांचा पुरवठा , परिणाम सुधारण्यासाठी आणि टिकाऊ, डेटा-चालित प्रणाली तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे. हे प्रयत्न सध्याच्या तसेच भविष्यातील आरोग्य आणि हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम आरोग्य प्रणाली तयार करण्याच्या केंद्रस्थानी आहेत. एक सबळ आणि साथीच्या रोगासाठी सज्ज आरोग्य सेवा तयार करण्याच्या आणि स्थिर करण्याच्या दृष्टीकोनातून, भारताने एक व्यापक आपत्कालीन आरोग्य समन्वयाचा आराखडा तयार केला आहे, जो आरोग्य सेवा प्रणाली मधील अनेक प्रमुख उपक्रम उदाहरणार्थ एकात्मिक रोग दक्षता ठेवण्यासाठी (आयडीएसपी) आणि व्ही कंट्रोल प्रोग्रॅमच्या (आयडीएसपी) माध्यमातून पशुजन्य आजार तसेच विषाणू वाहक प्राणीजन्य आजारांपासून राष्ट्रीय एकात्मिक रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय सज्जता, प्रतिसाद, लवचिकताआणि प्रतिबंध (NVBDCP),निर्माण करण्यावर केंद्रित आहे,असे ही त्यांनी पुढे सांगितले.

"सर्वांसाठी सुरक्षित आणि निरोगी भविष्य" सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य उपक्रमांमध्ये एकात्मता आणि सहयोगाच्या महत्त्वावर भर देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

महामारीच्या तयारीवरील क्वाड वर्कशॉप अधिक मजबूत, समन्वित जागतिक आरोग्य सुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असून भविष्यातील सार्वजनिक आरोग्य आव्हानांना लवचिकता आणि एकतेने तोंड देण्यासाठी राष्ट्रे अधिक सुसज्ज होत आहेत, हे त्यायोगे सुनिश्चित होते.
***
S.Kane/S.Patgonakar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111776)
Visitor Counter : 28