युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जेएलएन स्टेडियमवर केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्या होणारफिट इंडिया कार्निव्हलचे उद्घाटन
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराना कार्यक्रमाला राहणार उपस्थित
Posted On:
15 MAR 2025 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथील जेएलएन स्टेडियममध्ये 16 मार्च रोजी पहिल्या फिट इंडिया कार्निव्हलचा भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराना, कुस्तीपटू संग्राम सिंग आणि वेलनेस गुरु मिकी मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
20 ते 27 मार्च दरम्यान होणाऱ्या आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्सचे शुभंकर, लोगो आणि गाण्याचे अनावरण देखील या कार्यक्रमात केले जाईल.
16, 17, 18 मार्च रोजी होणाऱ्या या फिटनेस आणि वेलनेस फेस्टिव्हल, फिट इंडिया कार्निव्हलचा उद्देश निरोगी आणि कार्यमग्न जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे. हा उद्देश फिट इंडिया चळवळीच्या तंदुरुस्त, निरोगी आणि लठ्ठपणामुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
रोप स्किपिंग, स्टेशनरी सायकलिंग, आर्म रेसलिंग, क्रिकेट बॉलिंग, स्क्वॅट आणि पुश-अप चॅलेंज हे क्रीडा प्रकार या तीन दिवसांच्या कार्निव्हलचे आकर्षण असेल. भारतीय क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे (एनसीएसएसआर) डॉक्टर, पोषणतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ कार्निव्हलला येणाऱ्या लोकांना मोफत मार्गदर्शन करतील.
कलारीपयट्टू, मल्लखांब आणि गटकाचे मनमोहक सादरीकरण या कार्निव्हलमध्ये होणार आहे. तसेच नृत्यातून तंदुरुस्ती या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लाइव्ह डीजे संगीत, बँड असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2111553)
Visitor Counter : 12