वस्त्रोद्योग मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "द कॉटेज" ने आयोजित केले राष्ट्रीय व राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्या महिला कारागिरांच्या हस्तकलेचे विशेष प्रदर्शन
Posted On:
10 MAR 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 मार्च 2025
केंद्रीय कुटिरोद्योग महामंडळ अर्थात “द कॉटेज” ने आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 निमित्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्या महिला कारागिरांच्या हस्तकलेचे विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाच्या उपायुक्त कात्यायनी संजय भाटिया यांच्या हस्ते दि. 8 मार्च रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय कुटिरोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लाल उपस्थित होते.
कुटिरोद्योग क्षेत्रातील हस्तकारागीर व विणकर यांचे महत्व अधोरेखित करत मनोज लाल यांनी महामंडळाने देशभरातील 2000 हुन अधिक महिला कारागीर व विणकरांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावल्याचे सांगितले.या उपक्रमामुळे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या व वोकल फॉर लोकल या उद्दिष्टांना मदत होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कुशल महिला कारागिरांनी उद्योजक म्हणून प्रगती करावी या दृष्टीने त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महामंडळाने प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “द कॉटेज” ने प्रदर्शनाला भेट देणाऱ्या महिला ग्राहकांसाठी 15 % खास सवलत जाहीर केली आहे .या सवलतीमुळे महिला कलारसिकांना या प्रदर्शनात आपले हस्तकारागिरीतील कौशल्य दाखवणाऱ्या प्रतिभाशाली महिला कारागिरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त महिला कारागिरांनी प्रदर्शित केलेली हस्तकला उत्पादने तसेच प्रात्यक्षिके पाहण्यासाठी कृपया जवाहर व्यापार भवन, जनपथ , नवी दिल्ली इथे 8 मार्च ते 13 मार्च 2025 दरम्यान भेट द्यावी.


S.Kane/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109970)
Visitor Counter : 15