गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गांधीनगर, गुजरात इथे ‘शाश्वत मिथीला महोत्सव 2025’ ला केले संबोधित
Posted On:
09 MAR 2025 8:36PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या गांधीनगर इथे ‘शाश्वत मिथीला महोत्सव 2025’ला संबोधित केले. या महोत्सवाला मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि राज्यसभा सदस्य संजय कुमार झा आदींसह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्या लोकांचे स्वागत करण्याच्या गुजरातच्या दीर्घकालीन परंपरेवर त्यांनी प्रकाश टाकला. गुजरातने नेहमीच विविध विचारसरणी आणि जीवनशैली स्वीकारल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बिहारमधील लोकांनी विशेषतः मिथीलांचलमधील लोकांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत, राज्याच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन केले. तसेच ते सुरक्षित, सन्माननीय आहेत आणि गुजरातमध्ये त्यांचे नेहमीच स्वागत होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अमित शहा यांनी, मिथीला ही बौद्धिक विवाद आणि तात्विक वादविवादांची (शास्त्रार्थ) भूमी राहिली असल्यावर भर दिला. मग ते राजा जनक आणि याज्ञवक्ल्य यांच्यातील शास्त्रार्थ असो किंवा मंडण मिश्र आणि आदि शंकराचार्य यांच्यातील पौराणिक वादविवाद असो, जगभरात इतरत्र कोणत्याही स्थानापेक्षा संवादाद्वारे बौद्धिक वादविवाद सोडवण्याची परंपरा मिथिलाने कायम ठेवली आहे- या परंपरेचा विश्वपातळीवर अजूनही आदर केला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिथीलाच्या महिलांनी देशासाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. तसेच मिथीलामध्ये महिलांचा नेहमीच सर्वोच्च आदर केला गेला आहे. मैत्रेयी, गार्गी आणि भारती यांसारख्या विद्वान विदुषीं याज्ञवक्ल आणि कणाद मुनींइतक्याच आदरणीय आहेत असे सांगितले.
***
S.Kane/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2109720)
Visitor Counter : 34