संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय खासगी उद्योगाने बंगळुरू मध्ये एल सी ए एमके 1 ए चा पहिला मागील भाग संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला सुपूर्द केला

Posted On: 09 MAR 2025 5:25PM by PIB Mumbai

 

भारतीय खासगी उद्योग, अल्फा टोकॉल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादित केलेल्या हलक्या लढाऊ विमान एम के 1 चा पहिला मागील भाग 9  मार्च 2025 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील विमान विभागात संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला सुपूर्द केला. आपल्या संबोधनात, संरक्षण मंत्र्यांनी हे हस्तांतरण भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या ऐतिहासिक प्रवासातील एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. हा समारंभ संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या प्रगतीची आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची साक्ष देतो, असे ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी एचएएल आणि खासगी क्षेत्र सशस्त्र दलांना सातत्याने नवीनतम प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करत आहेत अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली आहे. एचएएल, त्याच्या एकात्मिक मॉडेल आणि धोरणांद्वारे केवळ सैनिकांचे सामर्थ्य वाढवत नाही तर खासगी क्षेत्राशी सहकार्य करून उत्पादन तसेच संशोधन आणि विकासाचे नवीन आयाम देखील उघडत आहे असे ते म्हणाले.

फ्यूजलेज हा विमानाचा मुख्य भाग असून यात वैमानिक, प्रवासी आणि मालवाहतूक होते, तर मागील भाग शेपटाकडच्या भागाला आणि त्याच्याशी संबंधित घटकांना आधार देतो. देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्राचे फ्यूजलेज म्हणून संरक्षणमंत्र्यांनी एचएएलचा  उल्लेख केला केले तर  एल अँड टी, अल्फा टोकॉल, टाटा ॲडव्हान्सड सिस्टम्स आणि व्हीईएम टेक्नॉलॉजीज सारख्या खासगी कंपन्या मागील बाजूच्या फ्यूजलेजची भूमिका बजावत एचएएलला पाठिंबा देत आहेत, असे ते म्हणाले.

एचएएलने याआधीच एलसीए एमके 1 ए मागील भागाचे 12 फ्यूजलेज तयार केले आहेत, जे विमानांमध्ये जोडले जाण्याच्या मार्गावर आहेत. या पुरवठ्यासह, भारतीय खासगी भागीदाराने तयार केलेले एक प्रमुख रचनात्मक मॉड्यूल एल सी ए एम के 1 ए विमानात एकत्रित केले जाईल, ज्यामुळे 2025-26 पासून एचएएलला भारतीय हवाई  दलासाठी अतिरिक्त वितरण वचनबद्धतेची पूर्तता करता येईल.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109678) Visitor Counter : 33


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali