आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी दूरदृश्य प्रणाली मार्फत एनआयएचएफडब्ल्यू’च्या 48 व्या वार्षिक दिन समारंभाचे भूषवले अध्यक्षपद. कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल देखील उपस्थित

Posted On: 09 MAR 2025 3:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दूरदृष्टी प्रणालीमार्फत आज राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या (एनआयएचएफडब्ल्यू) 48 व्या वार्षिक दिन समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

नड्डा यांनी आपल्या भाषणात "देशातील सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक, धोरणकर्ते आणि प्रशासकांसाठी प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता-निर्मिती उपक्रम राबविण्यात आघाडीवर" असल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे कौतुक केले. "देशात पात्र व्यावसायिकांची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात डॉक्टरेट आणि मास्टर्स अभ्यासक्रम सुरू करण्यातून संस्थेची क्षमता-निर्मिती करण्याची वचनबद्धता स्पष्ट होत असल्याचे, त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या संशोधन उपक्रमांनी आणि विविध सरकारी कार्यक्रमांच्या मूल्यांकनाने पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले.

"हे केंद्र सेवा प्रदान करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांच्या क्षमता-निर्मितीचे महत्त्वपूर्ण काम करत आहे, असे नड्डा यांनी संस्थेतील राष्ट्रीय शीत साखळी आणि लस व्यवस्थापन संसाधन केंद्राचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून उन्नत केले जात आहे. हा विस्तार केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर लसीकरण आणि पुरवठा-साखळीत भारताच्या नेतृत्वाचा दाखला  आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनुप्रिया पटेल यांनी "भारताची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था  बळकट करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य शिक्षण, संशोधन आणि धोरण आखणीत  जवळजवळ पाच दशकांच्या उत्कृष्टतेप्रति  अतूट वचनबद्धतेबद्दल" राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे कौतुक केले.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109656) Visitor Counter : 31