परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील भारताचा वारसाः नेतृत्त्व बांधिलकी आणि त्याग
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2025 11:58AM by PIB Mumbai

1945 मध्ये संयक्त राष्ट्रांची स्थापना, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या प्राथमिक ध्येयासह स्थापन झाली होती. 50पेक्षा अधिक संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये 2,90,000 हून अधिक कार्यरत असलेल्या शांतीरक्षकांससह, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी भारताने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सध्या, 5000 हून अधिक भारतीय शांतीसैनिक 9 सक्रीय मोहिमांमध्ये तैनात असून, आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करत आहेत. 24-25 फेब्रुवारी 2025 पासून, संयुक्त राष्ट्र शांतीसेना केंद्राने (CUNPK) नवी दिल्लीतल्या माणकेशॉ सेंटर, ‘ग्लोबल साऊथ मधील महिला शांती सेना' यावर परिषद आयोजित केली होती. या दोन दिवसीय परिषदेत 35 राष्ट्रांमधील महिला शांतीसैनिक शांतता मोहिमेत महिलांची वाढती भूमिका आणि त्यांचा सहभाग वृद्धींगत कऱण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आल्या होत्या. परिषदेने, भारताची लिंग समानतेप्रति असलेली कटिबद्धता आणि सर्वसमावेशक आणि प्रभावी शांतता मोहिमेसाठी प्रोत्साहन देण्यासाठीचे नेतृत्व अधोरेखित केले.

जागतिक प्रयत्न होत असूनही, संयुक्त राष्ट्रांच्या गणवेशधारी शांतता सैनिकांमध्ये, ज्यामध्ये लष्करी कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि निरीक्षक यांचा समावेश आहे, त्यात महिलांचे प्रमाण अजूनही 10% पेक्षा कमी आहे. अधिक लिंग समावेशकतेची गरज ओळखून, संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या गणवेशधारी लिंग समानता धोरणांतर्गत महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केली असून त्यात 2028 पर्यंत लष्करी दलामध्ये 15 % आणि पोलिस दलामध्ये 25 %महिलांचा समावेश कऱण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

फेब्रुवारी 2025 मध्येही भारताने आपला वारसा पुढे सुरू ठेवला असून, काँगो, दक्षिण सुदान, लेबनॉन गोलान हाईटस्, पश्चिम सहारा आणि अबेई यांचा समावेश असलेल्या सहा गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये 150 हून अधिक महिला शांतीसैनिकांनी सेवा दिली आहे. या तैनातीमुळे भारताची लिंग समानतेसाठीची कटिबद्धता आणि जागतिक शांतता आणि सुरक्षितता यामधील महिलांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.

भारतीय महिला शांतीसैनिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरत असून, त्यांच्या समर्पण आणि व्यावसायिकतेने इतरांना प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या योगदानामुळे केवळ शांतता मोहिमांचा प्रभाव वृद्धींगत झाला असे नाही तर जगभरातल्या शांतता प्रक्रियांमध्ये महिलांचा अधिक समावेश करण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे.
***
S.Kane/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2109653)
आगंतुक पटल : 99