मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबाद येथे 8 मार्च 2025 रोजी मत्स्य व्यवसायासंबंधी स्टार्टअप परिषद 2.0 चे आयोजन


परिषदेला केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंह बघेल आणि जॉर्ज कुरियन राहणार उपस्थित

राष्ट्रीय फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म मोबाईल ॲप; फिशरीज स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2.0 चे होणार अनावरण

Posted On: 07 MAR 2025 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2025

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने उद्या 8 मार्च 2025 रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे मत्स्यव्यवसाय स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2.0 चे आयोजन केले  आहे. या कार्यक्रमाला  केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, आणि पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री  प्रा. एस.पी. सिंह बघेल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्‍ये संबंधित खात्याचे सरकारी अधिकारी आणि उद्योजकांचाही सहभाग असणार आहे. 

स्टार्टअप परिषद 2.0 मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील नवोपक्रमांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख भागधारकांना एकत्र आणणार आहे. मत्स्यव्यवसाय/जलचर-पालनातील स्टार्टअप संधींसह या क्षेत्रातील ई-कॉमर्स संधींवरही चर्चा केली जाईल. स्टार्टअप परिषद 2.0 मध्ये राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (एनएफडीपी) मोबाईल ॲपचा प्रारंभही  करण्‍यात येणार आहे. हे ॲप म्हणजे मत्स्यव्यवसायाशी संबंधित सेवा आणि संसाधनांमध्ये डिजिटल प्रवेश सुलभ करण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनकारी उपक्रम आहे. मत्स्यव्यवसाय स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2.0 चे देखील अनावरण या परिषदेत केले जाईल.  यामुळे या क्षेत्रातील उद्योजकता आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देईल. याव्यतिरिक्त, मत्स्यव्यवसाय स्टार्टअपना उद्योजक मॉडेल तयार केले आहे, त्यामुळे या क्षेत्रातील उदयोन्मुख उद्योगांना पाठिंबा मिळू शकणार आहे. मत्स्यव्यवसाय स्टार्टअप परिसंस्थेला आणखी मजबूती प्रदान करेल.

तांत्रिक अभिप्राय आणि संवाद सत्रामध्‍ये  भारतातील मत्स्यव्यवसाय परिसंस्थेवर आणि राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ (एनएफडीबी) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांनी हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणार आहे. तसेच मत्स्यव्यवसाय स्टार्टअप्सद्वारे अनुभव सामायिक करण्‍यात येतील.

पार्श्‍वभूमी:

भारतातील मत्स्यपालन आणि इतर जलचर पालन व्यवसायामुळे या क्षेत्रात तीन  कोटी लोकांना उपजीविका मिळते. तसेच  मूल्य साखळीत रोजगार निर्माण होते. 2015 पासून, सरकारने शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी ‘नील क्रांती’  योजना, एफआयडीएफ, पीएमएमएसवाय आणि पीएम-एमकेएसएसवाय सारख्या उपक्रमांद्वारे  38,572 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. भारतातील मत्स्यपालन आणि इतर जलचर पालन  क्षेत्राच्या जलद वाढीमुळे 300  हून अधिक मत्स्यपालन स्टार्टअप्सच्या उदयाला चालना मिळाली आहे, ज्यामुळे नवोपक्रम आणि कार्यक्षमता वाढली आहे. हे स्टार्टअप्स ब्लॉकचेन, आयओटी आणि एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपाय विकसित करतात जे तळागाळातील आव्हानांना तोंड देतात, उत्पादकता वाढवतात, नेमका प्रश्‍न कुठे आहे, हे शोधणे सुनिश्चित करतात आणि मूल्य साखळी कार्यक्षमतेमध्‍ये  सुधारणा घडवून आणतात.

मत्स्यपालन विभागाने नवोपक्रमांना चालना देण्यासाठी आणि मत्स्यपालन स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मत्स्य मंथन मालिकेच्या माध्‍यमातून  भागधारकांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले जाते. उदयोन्मुख कल आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा सुलभतेने होऊ शकते. मत्स्यपालन स्टार्टअप परिसंस्था मजबूत करण्यासाठी, विभागाने समर्पित इनक्युबेशन सेंटर्स स्थापन केली आहेत. गुरुग्राममधील एलआयएनएसी- एलसीडीसी मत्स्यव्यवसाय इनक्युबेशन केंद्र (एलआयएफआयसी), हे पीएमएमएसवाय  अंतर्गत अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे.  त्याचे उद्घाटन 2021 मध्ये करण्यात आले. गुवाहाटी बायोटेक पार्क, आसाम येथे 9 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह मत्स्यव्यवसाय आणि जलसंवर्धनासाठी एक व्यवसाय इन्क्युबेटर्स स्थापन करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, तीन प्रमुख संस्था – एमएएनएजीई-  हैदराबाद, आयसीएआर- सीआयएफई-  मुंबई आणि आयसीएआर- सीआयएफटी-कोची यांना मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत किमान 100  मत्स्यव्यवसाय स्टार्ट-अप्स, सहकारी संस्था, एफपीओ आणि स्‍वयं सहायता समूहांना समर्थन देण्यासाठी इन्क्युबेटर्स म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय स्टार्टअप परिसंस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी, विभागामार्फत  भागधारकांशी  नियमित सल्लामसलत करण्‍यात येते. त्याचबरोबर येणारी  आव्हाने हाताळली जातात आणि आर्थिक मदत दिली जाते. याबरोबरच  या क्षेत्रातील वाढीसाठी धोरणात्मक हस्तक्षेप घडवून आणण्‍यात येतो.

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2109204) Visitor Counter : 22


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu