संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड आणि संरक्षणमंत्र्यांची नवी दिल्लीत घेतली भेट


हिंद-प्रशांत क्षेत्रात संरक्षण भागीदारीच्या शक्यतेवर केली चर्चा

Posted On: 03 MAR 2025 3:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2025

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 03 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड आणि संरक्षण मंत्री थियो फ्रँकेन यांच्याबरोबर बैठक झाली. उभय बाजूंनी हिंद-प्रशांत क्षेत्रात, विशेषतः सागरी क्षेत्रातील संरक्षण भागीदारीच्या शक्यतेवर चर्चा केली. त्यांनी उभय देशांमधील संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर आणि साधनांवरही चर्चा केली.

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रातील बेल्जियमच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. त्यांनी सुचवले की बेल्जियममधील कंपन्या भारतात आपला विस्तार करून तसेच त्यांच्या पुरवठा साखळीत भारतीय विक्रेत्यांचा समावेश करून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. याशिवाय दोन्ही देशांनी संस्थात्मक संरक्षण सहकार्य यंत्रणेचा वेध घेण्यास मंजुरी दिली.


N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2107739) Visitor Counter : 25