रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्पाची माहिती प्रसारित करणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून जनौषधी दिवस, 2025 च्या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचे केले उद्घाटन
Posted On:
01 MAR 2025 1:26PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली येथे, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्पाची माहिती प्रसारित करणारा रथ आणि इतर 10 वाहनांना निर्माण भवन येथे हिरवा झेंडा दाखवून जनऔषधी दिवस, 2025 च्या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आणि फार्मास्युटिकल्स विभागाचे सचिव अमित अग्रवाल उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना जगत प्रकाश नड्डा यांनी, सरकारच्या या महत्वाच्या प्रकल्पाविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी देशातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले, जेणेकरून जन-औषधींसाठी जन-आंदोलन निर्माण होईल.

अनुप्रिया पटेल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सातव्या जनऔषधी दिनानिमित्त देशभरात होणाऱ्या सात दिवसांच्या कार्यक्रमांची त्यांनी थोडक्यात माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, या योजनेविषयी जनजागृती व्हावी आणि जेनेरिक औषधांचा प्रचार व्हावा या उद्देशाने दरवर्षी 7 मार्च हा दिवस 'जनऔषधी दिवस' म्हणून साजरा केला जातो. मागील वर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 7 मार्च 2025 या कालावधीत देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज ज्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, ती वाहने राजधानी दिल्ली प्रदेशात (एनसीआर) पीएमबीजेपीची माहिती प्रसारित करतील.

28.02.2025 पर्यंत देशभरात 15000 जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. पीएमबीजेपीच्या उत्पादनांच्या बास्केटमध्ये 2047 औषधे आणि 300 सर्जिकल उपकरणे आहेत जी ब्रँडेड औषधांपेक्षा किरकोळ दुकानांमध्ये 50% ते 80% स्वस्त दराने विकली जातात.
पीएमबीजेपी अंतर्गत, सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25000 जेएके उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मार्च 2025 पर्यंत 15000 जेएके उघडण्याचे उद्दिष्ट पीएमपीआयने 31.01.2025 रोजी पूर्ण केले आहे.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2107450)
Visitor Counter : 15