वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या वारशाची आणि भविष्यातील विकासाची गुरुकिल्ली म्हणजे डिझाईन: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा 44वा दीक्षांत समारंभ, 430 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
Posted On:
28 FEB 2025 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
डिझाइन हे केवळ सौंदर्यशास्त्राशी संबंधित नव्हे, तर ते एक नवोपक्रम देखील आहे. याचा भारताच्या वारशावर प्रभाव असून ते देशाच्या विकासात भूमिका बजावेल असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. ते गुरुवार, 27 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय डिझाइन संस्थेच्या (एनआयडी) 44 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करीत होते. नवीन पदवीधर हे देशाच्या वारशा आणि भविष्यातील दुवा म्हणून काम करतील, असे त्यांनी पुढे नमूद केले.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद आणि गव्हर्निंग कौन्सिल सदस्य देखील या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
जगासाठी 'मेक इन इंडिया' आणि 'डिझाइन इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर प्रकाश टाकताना, मंत्री गोयल यांनी नमूद केले की नवीन पदवीधर ही संकल्पना प्रत्यक्षात आणतील. हे पदवीधर समस्या सोडवणारे, नवोन्मेषक आणि डिझायनर म्हणून जगासाठी काम करतील यावर त्यांनी भर दिला. "तुम्ही जगाचे शिल्पकार व्हाल, जग तुमची प्रतीक्षा करत आहे", असे ते म्हणाले.
44 व्या दीक्षांत समारंभात विविध विषयांतील 430 विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनकडून पदवी प्रदान करण्यात आल्या.
* * *
S.Tupe/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106851)
Visitor Counter : 33