मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
भारतीय प्राणी कल्याण मंडळातर्फे 27 फेब्रुवारी 2025 रोजो नवी दिल्ली येथे प्राणी संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव
केंद्रीय राज्यमंत्री प्रा.एस.पी.बघेल आणि जॉर्ज कुरियन या कार्यक्रमाला राहणार उपस्थित
Posted On:
26 FEB 2025 2:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 26 फेब्रुवारी 2025
भारतीय प्राणी कल्याण मंडळातर्फे (एडब्ल्यूबीआय) देण्यात येणाऱ्या प्राणीमित्र आणि जीव दया पारितोषिक वितरण समारंभ उदया 27 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आल्याची घोषणा मंडळाने केली आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रा.एस.पी.बघेल आणि जॉर्ज कुरियन या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय पशुपालन विभाग सचिव अलका उपाध्याय, पशुपालन आयोगाचे आयुक्त आणि एडब्ल्यूबीआयचे अध्यक्ष डॉ.अभिजित मित्र यांच्यासह विविध राज्यांच्या प्राणी कल्याण मंडळांचे प्रतिनिधी, प्राण्यांशी केल्या जाणाऱ्या क्रूर वर्तनासाठीनेमलेल्या जिल्हा संस्था (एसपीसीएएस), गौ सेवा आयोग, प्राणी प्रेमी, विविध प्राणी कल्याण संस्थायांचे प्रतिनिधी देखील एडब्ल्यूबीआयच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित असतील.
ही पारितोषिके दोन विभागांसाठी देण्यात येतील, प्राणीमित्र आणि जीव दया. प्राणी मित्र पारितोषिक पुढील पाच उप विभागांतर्गत देण्यात येतील: समर्थन (वैयक्तिक), नावीन्यपूर्ण संकल्पना (वैयक्तिक), प्राणीसेवा जीवन गौरव (वैयक्तिक)यांसह प्राणी कल्याण संघटनेसाठी एक तसेच कॉर्पोरेट, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सरकारी संस्था किंवा सहकारी संस्था यांसाठी एक पारितोषिक देण्यात येईल. जीव दया पारितोषिक पुढील तीन उपविभागांतर्गत देण्यात येईल: वैयक्तिक, प्राणी कल्याण संस्था आणि शाळा, शैक्षणिक संस्था, शिक्षक किंवा लहान मुले.
प्राणी कल्याण तसेच संरक्षण या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अप्रतिम कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ही पारितोषिके दिली जातात. प्राण्यांना मानवतावादी पद्धतीने वागणूक दिली जाण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतानाच, समाजातील प्राण्यांविषयी दयाळूपणा आणि करुणाभाव यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या सोहोळ्याचा मुख्य उद्देश आहे.
भारतीय प्राणी कल्याण मंडळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106470)
Visitor Counter : 28