माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपटांचे पोस्टर बनवण्याची स्पर्धा
Posted On:
24 FEB 2025 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025
कलेचा चित्रपटांशी संगम
परिचय
भारताचे चित्रपटाशी असलेले दृढ नाते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पोस्टर्समध्ये दिसून येते ज्यात कथा आणि भावना उत्तम प्रकारे टिपलेल्या असतात. हा कलाप्रकार साजरा करण्यासाठी जागतिक दृक- श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेने (वेव्हज) 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1' चा भाग म्हणून चित्रपटांचे पोस्टर बनवण्याची स्पर्धा जाहीर केली आहे. एनएफडीसी-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय , आंतरराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय महासंघ आणि इमेज नेशन स्ट्रीट आर्ट यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा भारतीय चित्रपट पोस्टर्सच्या समृद्ध वारसा अधोरेखित करते. यासाठी 296 नोंदणी झाल्या असून हा कार्यक्रम यानिमित्ताने सर्जनशीलतेचे एक जिवंत दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन देतो.

जागतिक दृक- श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची (वेव्हज) ही पहिली आवृत्ती संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या एकत्रीकरणासाठी सज्ज असे एक अद्वितीय केंद्र आणि बोलके व्यासपीठ आहे.
हा कार्यक्रम एक प्रमुख जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे भारतात लक्ष वेधणे आणि त्याला भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी त्याच्या प्रतिभेसह जोडणे हा आहे.
ही परिषद 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे होणार आहे. ब्रॉडकास्टिंग आणि इन्फोटेनमेंट, एव्हीजीसी -एक्सआर , डिजिटल मीडिया आणि इनोव्हेशन आणि फिल्म्स चार प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करून वेव्हज भारताच्या मनोरंजन उद्योगाचे भविष्य दाखवण्यासाठी अग्रणी , निर्माते आणि तंत्रज्ञांना एकत्र आणणार आहे.
चित्रपट पोस्टर बनवण्याची स्पर्धा ही फिल्म्स या चौथ्या स्तंभाअंतर्गत येते, जी भारतीय चित्रपटाचे सार साजरे करण्याभोवती केंद्रित आहे. ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण त चित्रपट पोस्टर्समागील कलात्मक समृद्धता आणि कौशल्य अधोरेखित करते, ज्यामध्ये समकालीन प्रेक्षकांसाठी त्यांची पुनर्कल्पना करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
स्पर्धा श्रेणी
चित्रपट पोस्टर बनवण्याची स्पर्धा दोन श्रेणींमध्ये आयोजित केली जाईल:

डिजिटल पोस्टर्स
नोंदणी:
डिजिटल पोस्टर श्रेणीसाठी नोंदणी 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झाली आणि 15 मार्च 2025 पर्यंत खुली राहील. सहभागासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या आणि प्रतिमेत दाखवलेल्या 20 चित्रपट शीर्षकांपैकी एक चित्रपट निवडा:

महत्त्वाच्या अंतिम मुदती:
सर्व कलाकृती वेळेत नमूद केलेल्या निर्दिष्ट अंतिम मुदतीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे:
पोस्टर डिझाइन नोंदणीला सुरुवात : 1 ऑक्टोबर 2024 - 15 मार्च 2025
अंतिम कलाकृती 15 मार्च 2025 पर्यंत सादर करावी लागेल
विजेत्याची घोषणा: 1 एप्रिल 2025
निवडलेल्या कलाकाराचे प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळा: एप्रिल 2025
कलाकृती सादर करण्यासाठी तपशील:
तुमची कलाकृती 300 DPI वर CMYK मध्ये JPEG/PNG फाइल म्हणून अपलोड करा. पोस्टर उभ्या दिशेने असावे :
स्टॅण्डर्ड आकार: 24 x 36 इंच (आस्पेक्ट रेशो 2:3)
पर्यायी आकार: 18 x 24 इंच (आस्पेक्ट रेशो 3:4)
कमाल फाइल आकार: 10 एमबी
कृपया खालील फाइल नेमिंग स्ट्रक्चरप्रमाणे कलाकृतीला नाव द्या: artistname_filmname_year_waves2024.jpeg
पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रे :
उत्कृष्ट डिजिटल पोस्टर्सची निवड वेव्हज शिखर परिषदेत प्रदर्शित अव्वल 20 निवडक कलाकृतींमधून केली जाईल आणि 20 पैकी अव्वल 3 कलाकृतींना प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाईल. रोख बक्षिसे आणि डिजिटल प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित केले जाईल. तपशील पुढे दिला आहे :
हाताने रंगवलेले पोस्टर्स
नोंदणी
उमेदवार निवडक कला संस्थांच्या माध्यमातून हॅन्ड पेंटेड फिल्म पोस्टर मेकिंग स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.स्पर्धा आयोजित करण्यास इच्छुक संस्था imagenationstreetart[at]gmail[dot]com या ईमेल आयडीवर cc मध्ये nfaifilmcircle@nfdcindia ठेवून पाठवू शकतात.
डिजिटल पोस्टर निर्मिती यादीमध्ये दिल्याप्रमाणेच ही पोस्टर्स 20 चित्रपटांच्या शीर्षकांवर आधारित असली पाहिजेत.
- उपांत्य फेरीत प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक संस्था त्यांच्या अंतर्गत स्पर्धेच्या माध्यमातून तीन उमेदवारांची निवड करेल.
- ही स्पर्धा केवळ संस्थांसाठी असून वैयक्तिक स्पर्धकांसाठी खुली नाही.
महत्त्वाच्या अंतिम मुदतींची माहिती:
महाविद्यालयांच्या अंतर्गत स्पर्धा : 1 नोव्हेंबर – 15 मार्च 2025
निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा : 1 एप्रिल, 2025
पारितोषिके आणि सन्मान:
सादर झालेल्या सर्व अर्जांतून परीक्षकांद्वारे निवड प्रक्रियेतून निवडलेल्या एकूण 25 कलाकारांना प्रत्यक्ष सादरीकरण कार्यक्रमात भाग घ्यावा लागेल. वेव्हज परिषदेत विहित कालमर्यादेत या कलाकारांना हाताने काढलेली पोस्टर्स बनवायची असून त्यातील सर्वोत्तम तीन कलाकृतींना प्रतिष्ठित पारितोषिके देण्यात येतील. पारितोषिक स्वरुपात पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्रासह प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 30,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये देण्यात येतील. त्यासोबतच उर्वरित सर्व सहभागींना त्यांच्या रोख रकमेच्या बक्षिसासह डिजिटल प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात येईल.
नोंदणी
या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2025 रोजी सुरु झाली असून ती 5 मार्च 2025 रोजी समाप्त होईल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.संकेतस्थळावर दिलेल्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही नोंदणी करून तुमची कलाकृती सादर करू शकता.तुमचे पोस्टर तयार करण्यासाठी तुम्ही उपलब्ध 10 शीर्षकांमधून एक चित्रपट निवडू शकता.
महत्त्वाच्या अंतिम मुदतींची माहिती:
सर्व कलाकृती टाईमलाईनमध्ये निर्दिष्ट केलेल्या अंतिम मुदतीच्या आत सादर केल्या पाहिजेत:
·नोंदणी तसेच सादरीकरण कालावधी: 5 फेब्रुवारी, 2025 – 5 मार्च, 2025
·विजेत्यांची घोषणा : 1 एप्रिल, 2025
· प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ : एप्रिल 2025
पात्रता निकष:
·भारताबाहेरील कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या व्यक्ती
·स्पर्धकाचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
कलाकृती सादर करण्यासाठीचे तपशील:
तुमची सीएमवायकेमध्ये 300 डीपीआयची कलाकृती जेपीईजी/पीएनजी फाईल स्वरुपात अपलोड करा. पोस्टर उभ्या स्वरुपात असावे.
प्रमाणित आकार: 24 x 36 इंच (2:3 अशा प्रमाणात)
पर्यायी आकार : 18 x 24 इंच (aspect ratio 3:4अशा प्रमाणात)
फाईलचा कमाल आकार : 10 एमबी
पारितोषिके आणि सन्मान:
आंतरराष्ट्रीय डिजिटल पोस्टर निर्मिती स्पर्धेतून उत्कृष्ट सर्जनशीलतेला ओळख देईल आणि असाधारण कलाकृतींचा पारितोषिके तसेच सन्मान करेल. यातील ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे आहेत:
·निवडलेल्या सर्वोत्तम 20 डिजिटल कलाकृती वेव्हज परिषदेत प्रदर्शित केल्या जातील.
·प्रदर्शनातील सर्वोत्तम 3 कलाकृतींना प्रतिष्ठित पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.
·पारितोषिकांच्या संदर्भातील अधिक तपशील लवकरच जाहीर करण्यात येतील.
निष्कर्ष
या मंचाच्या माध्यमातून जगभरातील कलाकार एकमेकांशी जोडले जाऊन, निर्मिती करून, मनोरंजन उद्योगाच्या रंगीबेरंगी भविष्याचा भाग होतील ज्याचा कळसाध्याय मे 2025 मध्ये होणाऱ्या वेव्हज परिषदेत प्रतिष्ठित प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभात होईल.
- https://wavesindia.org/challenges-2025
- https://www.nfdcindia.com/waves-poster-challenge-2025/
- https://x.com/WAVESummitIndia/status/1845466425575735387
Click here to download PDF
N.Chitale/S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105964)
Visitor Counter : 8