राष्ट्रपती कार्यालय
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, भारतीय रेल्वे सुरक्षा दल सेवा, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा) आणि भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (वाहतूक) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
24 FEB 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा विभाग, भारतीय रेल्वे सुरक्षा दल सेवा,भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (लेखा) आणि भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (वाहतूक) या विभागांच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (24 फेब्रुवारी 2025)भेट घेतली.

2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या महान राष्ट्रीय प्रयत्नात त्यांची भूमिका विशेष महत्वाची आहे; असे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या संपूर्ण संस्थेचा पाया भारतीय राज्यघटनेतील तरतुदींवर आधारित आहे म्हणून त्या कायम लक्षात ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला.राज्यघटनेच्या भाग-V चा अध्याय-V हा त्यांना या संस्थेची भूमिका, कर्तव्ये आणि अधिकार यांची जाणीव करून देतो, तर घटनेची प्रस्तावना आणि कॅगची शपथ हा या संस्थेतील प्रत्येकाचा महत्त्वाची भूमिका आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी असलेला मार्गदर्शक असायला हवा. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना नाविन्यपूर्ण उपायांसह संबंधितांना मार्गदर्शन आणि सुविधा प्रदान करण्याचे आवाहन केले. मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका जितकी महत्त्वाची असेल तितकीच एक प्रमुख आणि नियंत्रक म्हणूनही ती महत्त्वाची असेल, असे हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

रेल्वे सेवा अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतातील अनेक लोक दररोज रेल्वेचा वापर करतात. रेल्वे सेवा अधिकारी या नात्याने, गतिशीलतेला चालना देण्यात आणि त्याद्वारे आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. रेल्वे सेवा मोठ्या संख्येने लोकांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता निर्धारित करतात, असे त्यांनी अधोरेखित केले.देशाचे रुप बदलणारे आणि सेवा प्रदाता म्हणून रेल्वेच्या एकूण परिणामकारकतेसाठी आपण काम करत आहात,हे कायम लक्षात ठेवण्याचा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.


राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105868)
Visitor Counter : 16